Search This Blog

Tuesday, 6 January 2026

जिल्ह्यात 15 जाने. ते 7 फेब्रु. दरम्यान सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान

 


जिल्ह्यात 15 जानेते फेब्रुदरम्यान सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान

Ø तपासणी व जनजागृती मोहीम

चंद्रपूरदि. 05 : जिल्ह्यात सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहेसार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार या अभियानासाठी जिल्हास्तरावर व्यापक पूर्वतयारी व नियोजन पूर्ण करण्यात आले आहेसिकलसेल आजाराचा प्रतिबंध व नियंत्रण राखण्यासाठी या कालावधीत विशेष जनजागृतीतपासणी व समुपदेशन मोहीम राबविण्यात येणार आहे.

40 वर्षापर्यंतच्या वयोगटातील सर्व नागरिकांची सिकलसेल तपासणी रुग्ण व वाहकाची नोंदणी आवश्यकतेनुसार HPLC/इलेक्ट्रोफोरेसीस चाचण्या तसेच रुग्णांना उपचार व समुपदेशन देण्यात येणार आहेभावी पिढीतील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी विवाहपूर्व व प्रसूती पूर्व समुपदेशन सत्राचे आयोजन ही करण्यात येणार आहेही मोहीम अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयेग्रामीण रुग्णालयप्राथमिक आरोग्य केंद्रेउपकेंद्र मध्ये आवश्यक मनुष्यबळ व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेतजनजागृतीसाठी पोस्टरपत्रकेसोशल मिडियागृहभेटीआदि माध्यमांचा वापर केला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : ही मोहीम जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहेसर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी व सिकलसेल मुक्त चंद्रपूर जिल्हा घडविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment