Search This Blog

Monday, 12 January 2026

जिल्हाधिका-यांनी घेतला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा सर्वंकष आढावा



जिल्हाधिका-यांनी घेतला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा सर्वंकष आढावा

Ø एचआयव्हीसह जगणाऱ्या व अतिजोखीम गटातील समुहाला शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश

चंद्रपूरदि. 12 : चंद्रपूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचा त्रैमासिक आढावा  जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.  राष्ट्रीय एड्स कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेतया आरोग्य योजना रुग्णांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागरजिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉललितकुमार पटलेजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मेमनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉनयना उत्तरवारजिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवारएआरटी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉदिलीप मडावीडॉश्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिलीएप्रिल ते नोव्हेंबर 2025 मध्ये जिल्हयात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांच्या  एचआयव्ही व सिफिलिस चाचण्या झाल्यात्यामध्ये संक्रमित आढळलेल्या संपूर्ण जणांना उपचारावर घेण्यात आलेतसेच या कालावधीतील सर्व गरोदर मातांची एचआयव्ही व सिफिलिस चाचणी झाली.

तसेच अतिजोखीम गटात असणाऱ्या टीजीएमएसएमएफएसडब्ल्यु यांना अंत्योदय,आधार कार्डमतदान कार्डतसेच संजय गांधी निराधार योजनेचा पाठपुराव  व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा समुदाय संसाधन समूह स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत अतिजोखिम गटातील समुहाला मिळणाऱ्या शासकीय योजना संदर्भात येणाऱ्या कागदपत्राच्या अडचणीबाबत उपाययोजना करण्याच्य सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील अतिजोखीम गटात असणाऱ्या समुदायातील प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करावेतसेच एचआयव्ही सह जगणाऱ्यासाठी शासनाची मोफत बस पास योजनाएचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांसाठी बाल संगोपन योजना व मिशन वात्सल्य योजनातसेच विमा कवचसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळावीयासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या.

आढावा सभे दरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात यावर्षात राबविण्यात आलेल्या मॅराथॉन स्पर्धाप्रश्न मंजुषा स्पर्धामाध्यमिक शिक्षकांची कार्यशाळापोलीस कार्यशाळारेल्वे कर्मचाऱ्यांची कार्यशाळामहाविद्यालय स्तरावर संवेदीकरण कार्यशाळाग्राम पंचायत स्तरावर बैठकाकामगार कल्याण मंडळाची कार्यशाळा, 15 संवेदनशील गावांमध्ये पथनाट्यप्लॅश मौब व एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांना पौष्टिक आहार वाटप या बद्दल सविस्तर माहिती दिली.

आढावा सभेला संबोधन ट्रस्टसंकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थानोबल शिक्षण संस्थाक्राईस्ट हॉस्पीटलप्लॅन इंडिया आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment