Search This Blog

Tuesday, 20 January 2026

यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन


यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जानेवारी 2026 पर्यंत

चंद्रपूरदि. 20 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाडःमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2025 करीता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्वयशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 30 जानेवारी, 2026 पर्यंत पाठविता येणार आहेत.

दि. 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेतया स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळरविंद्र नाट्यमंदीर इमारतदुसरा मजलासयानी मार्गप्रभादेवी मुंबई -400025    यांच्या कार्यालयात तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणुक शाखाविनामुल्य उपलब्ध होतील.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नविन संदेश या सदरात स्वयशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय प्रस्कार 2025 नियमावली व प्रवेशिका या शिर्षाखाली व 'What's new' या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award 2025 Rules Book and Application Form' या शीर्षाखाली राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या व महाराष्ट्र http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तीका उपलब्ध होतीलप्रेवशिका पुर्णत: भरून आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 30 जानेवारी 2026 पर्यंत विहीत कालावधीत पोहचतील, अशा बेताने पाठवाव्यात.

लेखक /प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतातलेखक प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक जानेवारी, 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत विहीत कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिवमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहेलेखक प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यांवर पाकीटांवर "स्वयशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार 2025 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावाअसे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार

००००००

No comments:

Post a Comment