Search This Blog

Friday, 9 January 2026

काढणी पश्चात पायाभुत सुविधा अंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज करा


काढणी पश्चात पायाभुत सुविधा अंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज करा

Ø राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26

            चंद्रपूर, दि. 08 :  राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 करीता तेल काढणी युनिट (10टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिट (प्रमुख आणि दुय्यम तेलबिया) या घटकाचे जिल्ह्यास लक्षांक प्राप्त आहे. यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल रुपये 9 लक्ष 90 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.

ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके घेतली जातात तथापी तेल काढणी युनिटची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी तेल काढणी युनिट स्थापन करता येईल. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार CIPHET, लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेली Mini Oil Mill/Oil Expeller ची उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेलला सदरील अनुदान अनुज्ञेय राहील.

सदरील बाबींचा लाभ शासकीय/खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी आणि सहकारी संस्था यांच्यासह वैयक्तीक लाभार्थी सुध्दा लाभास पात्र राहील. तालुका कृषी अधिकारी यांनी अशा अर्जदारांचे अर्ज पूर्वसंमतीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे 15 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment