Search This Blog

Tuesday, 13 January 2026

नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी पोलिसांचे ‘स्मार्ट -ई -बीट’ पथक


नायलॉन मांजा प्रतिबंधासाठी पोलिसांचे ‘स्मार्ट - -बीट’ पथक

Ø विक्री व वापर करणा-यांवर ड्रोनद्वारेही निगराणी

Ø नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 13 : नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असून त्याच्या सर्रास वापरामुळे दरवर्षी अनेक नागरिक गंभीर जखमी होतात तर काहींना जीवही गमवावा लागतो. याची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून जिल्हा प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाला सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर पोलिस विभागामार्फत विशेष ‘स्मार्ट – ई- बीट’ पध्दतीने पेट्रोलिंग पथक नेमण्यात आले आहे. तसेच नायलॉन मांजाचा वापर, खरेदी व विक्री करणा-यांवर ड्रोनद्वारेही निगराणी ठेवण्यात येणार असून त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल.

जर कोणीही नायलॉन मांजाचा वापर करतांना किंवा विक्री करतांना आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ चंद्रपूर पोलिस दलाचे व्हॉट्सॲप क्रमांक 7887890100 आणि टोल फ्री क्रमांक 112 वर कळवावेमाहिती देणा-यांचे नावव गोपनीय ठेवण्यात येईलअसे पोलिस विभागाने कळविले आहे.

 उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या वापराबाबत दखल घेऊन 12 जानेवारी 2026  रोजी आदेश पारित केले आहेत्यात उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहेन्यायालयाच्या आदेशानुसारप्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्रीसाठा किंवा वापर करणा-यांवर आता मोठी दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

अशी आकारली जाईल दंडाची रक्कम :

1) विक्रेत्यांसाठी दंड :  नायलॉन मांजा विकतांना जर कोणी आढळून आला तर संबंधितास लक्ष 50 हजार रुदंड जागीच तात्काळ आकारण्यात येईल.

2) वापरकर्त्यांसाठी दंड : जर कोणी नायलॉन मांजाचा वापर करू न पतंग उडवितांना मिळून आल्यास त्याचेकडुन 25,000/- रुदंड जागीच तात्काळ आकारण्यात येईल.

3) जर अल्पवयीन मुले नायलॉन मांजाचा वापर करून पंतग उडवितांना मिळून आल्यास त्याच्या पालकांकडून 25 हजार रुपये दंड जागीच तात्काळ आकारण्यात येईल.

4) जर कुणी दंड भरण्याबाबत टाळाटाळ करत असेल तर त्याच्याकडून जमीन महसूल कायद्याप्रमाणे दंड वसुल केला जाईल.

5) प्रत्येक उल्लंघनासाठी स्वतंत्र दंड आकारण्यात येईल.

6) वरील बाबत उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर फौजदारी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

7) सदर दंडाची रक्कम जागेवरच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या युनियन बॅंक ऑफ इंडिया मधील पब्लीक वेलफेअर खाते क्रमांक 129712010001014, IFSC UBIN0812978 वर जमा करावी लागेल.

 8) या जाहीर सुचनेची माहिती नव्हती किंवा अज्ञान होते ही बाब दंड टाळण्यासाठी ग्राहय धरली जाणार नाहीअसेही कळविण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment