Search This Blog

Friday, 2 January 2026

ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार

 

ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार

चंद्रपूरदि. 02 : राज्य शासनाच्या निर्देशान्वये 15 जानेवारी हा दिवस ऑलम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहेस्वतंत्र भारताचे पहिले ऑलम्पिक पदक विजेते महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशाबा जाधव यांचा जीवनातून नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावेयासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासनमान्य खाजगी शाळामहाविद्यालयविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयक्रीडा संघटना/असोशिएसनक्रीडा मंडळेक्रीडा अकादमीशासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ/अनुदान मिळालेल्या सर्व संस्थाअन्य संस्था व मंडळे यांनी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करावेअसे निर्देश प्राप्त झाले आहेत.

याअंतर्गत खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करावेप्रा.संजय दुधाने लिखित ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव’ हे पुस्तक प्रत्येक शाळा महाविद्यालयांच्या ग्रंथालयात खेळाडूंना वाचनासाठी उपलब्ध असावेतक्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅलीचे / मॅरेथान स्पर्धांचे आयोजन करावेशालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळासंदर्भातील नियमावलीआलिंपिक स्पर्धासोबतच अन्य महत्वाच्या स्पर्धात्यामधील यशस्वी खेळाडू व अन्य बाबी यांची प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तसेच ऑनलाईन संपर्क माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवाद साधावा.

विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने व विजेत्यांना पुरस्कार वितरणआंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव,  क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडूप्रशिक्षक तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडूशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनीपालकक्रीडा प्रेमीनागरिक यांच्यासोबत क्रीडा क्षेत्रातील करीअर संधीबाबत परिसंवाद व चर्चासत्रे आयोजित करावेयशस्वी क्रीडा विषयक उपक्रम तसेच क्रीडा सुविधांनी युक्त क्रीडा संकुलअकादमी संस्था यांना भेटी देणे व आपल्या स्तरावर क्रीडा विषयक अभिनव उपक्रम राबविण्यात यावे व अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला सादर करावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment