Search This Blog

Monday, 5 January 2026

7 जानेवारी पासून चाचा नेहरू बाल महोत्सव


7 जानेवारी पासून चाचा नेहरू बाल महोत्सव

         चंद्रपूरदि. 05 :  चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल करण्यात येणाऱ्या अनाथनिराधारनिराश्रीत ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहेअसे बालक व विधी संघर्षग्रस्त बालकेबालसंगोपन योजनेचे लाभार्थी तसेच शाळांमध्ये शिकत असलेले सर्वसामान्य बालके यांच्यामध्ये एकमेकांविषयी बंधुभाव निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता 7 ते 9 जानेवारी 2026 रोजी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सदर जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन विनय गौडा यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील 12 शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळइंडोर खेळ तथा सांस्कृतिक स्पर्धाखो-खोकबड्डीधावणेबुद्धिबळकॅरमवक्तृत्वनिबंधचित्रकलावादविवादरांगोळीनृत्यगायननक्कल आणि एकांकिका आदी स्पर्धेकरीता विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. बक्षीस 9 जानेवारी 2026 ला होणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment