Search This Blog

Monday, 12 January 2026

चंद्रपूरसह पाच जिल्ह्यात राबविण्यात येणार महा पाणलोट प्रकल्प


 चंद्रपूरसह पाच जिल्ह्यात राबविण्यात येणार महा पाणलोट प्रकल्प

चंद्रपूरदि. 12 : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ॲक्सिस बँक फाऊंडेशनभारत ग्रामीण जीविका फाऊंडेशन व मनरेगा यांच्यात परस्पर सहकार्याने झालेल्या सामंजस्य करारानंतर राज्यातील चंद्रपूरगडचिरोलीगोंदियानांदेड आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यामध्ये प्रभावशाली महा पाणलोट प्रकल्प (हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प महाराष्ट्र)  राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देशग्रामपंचायतींनाचे बळकटीकरण करून कामांचे नियोजनसंनियत्रण व अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामपंचायतीना सहयोग करण्यासाठी भारत ग्रामीण जिविका फाऊंडेशनच्या वतीने 10 नागरी सामाजिक संघटनांची निवड करण्यात आली आहेप्रत्येक संघटना दोन तालुक्यांमध्ये काम करणार आहेहे प्रकल्प वर्षापर्यंत राबविण्यात येईल.

या प्रकल्पाचे उदिष्ट 26 तालुक्यांमध्ये एकूण 878 मायक्रो वॉटरशेडचा विकास करणे आहे –त्यामाध्यमातून 4.39 लक्ष हेक्टर जमिनीचे उपचार करणे त्याचबरोबर खालील प्रमाणे उदिश्टे ठरविण्यात आले आहेत.

1. कमीत कमी एक लक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, 2. जवळपास 1.77 लक्ष हेक्टर असिंचित जमीन सिंचीत करणे, 3. 800 ग्रामरोजगार सेवक व हजार बचत गट सदस्यांना जिल्हा नियोजन अहवाल व जिविका प्लॉनच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करीता प्रशिक्षण देणे, 4. मृदा व जलसंधारणाच्या व्यवस्थापनाद्वारे जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे तसेच पावसाच्या पाण्यावर कमी अवलंबून राहणेबहुपीक प्रणालीला प्रोत्साहन देणे, 6. मनरेगाच्या निधीचा उपयोग करून टिकाऊ व उत्पादक संरचनांची निर्मिती करणे, 6.प्रकल्पाचे यशस्वी व प्रभावीपणे प्रशासकीय नेतृत्वासह संबंधित विभागासोबत अभिसरण करणे.

या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांकडून 1) जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यास मदत करणे. 2) जिल्हास्तरीय समन्वय समिती निर्मिती व मासिक बैठकांचे आयोजन करण्यास सहकार्य करणे 3) तालुकास्तरीय समन्वय समितीची निर्मिती करणे 4)  विविध विभागासोबत समन्वय साधण्याकरीता जसे कृषी विभागवन विभागजलजीवन मिशनपशु संवर्धन विभागसिंचन विभाग जि.व इतर विभागासह जिल्हास्तरावर समन्वय साधण्याकरीता प्रत्येक विभागाचा एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करणे.

सदर प्रकल्प वर्षामध्ये पूर्ण करायचा असल्यामुळे सर्व विभागासोबत परस्पर सहकार्य आणि समन्वयासाठी जिल्हा प्रशासनाची भुमिका अत्यंत महत्वाची आहेअसे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment