Search This Blog

Wednesday, 14 January 2026

जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर

 जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर

चंद्रपूरदि. 14 : चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामाची 1788 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहेसंपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी 0.54 पैसे आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1836 गावे असून खरीप पिकांची 1833 गावे आहेतत्यापैकी 1788 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहेउर्वरीत 48 गावांमध्ये पीक नसल्यामुळे सदर गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाहीचंद्रपूर जिल्ह्यात एकूण गावांची संख्या 1836, पैसेवारी जाहीर करावयाची गावे 1788,  50 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 942, तर 50 पैसे व त्यापेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या 846 आहे.

अशी आहे तालुकानिहाय आकडेवारी  :  चंद्रपूर तालुका (एकूण गावे – 101, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 86, तालुका पैसेवारी – 0.53),  बल्लारपूर तालुका (एकूण गावे – 35, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 32, तालुका पैसेवारी – 0.45), राजुरा तालुका (एकूण गावे – 111, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 110, तालुका पैसेवारी – 0.48), कोरपना तालुका (एकूण गावे – 113, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 113, तालुका पैसेवारी – 0.47), जीवती तालुका (एकूण गावे – 83, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 75, तालुका पैसेवारी – 0.58), गोंडपिपरी तालुका (एकूण गावे – 98, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 98, तालुका पैसेवारी – 0.47), पोंभुर्णा तालुका (एकूण गावे – 71, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 71, तालुका पैसेवारी – 0.54), मूल तालुका (एकूण गावे – 113, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 111, तालुका पैसेवारी – 0.58), सावली तालुका (एकूण गावे – 111, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 111, तालुका पैसेवारी – 0.69), सिंदेवाही तालुका (एकूण गावे – 115, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 113, तालुका पैसेवारी – 0.56), चंद्रपूर नागभीड (एकूण गावे – 138, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 138, तालुका पैसेवारी – 0.65), ब्रम्हपुरी तालुका (एकूण गावे – 140, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 138, तालुका पैसेवारी – 0.62), चिमूर तालुका (एकूण गावे – 259, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 258, तालुका पैसेवारी – 0.47), वरोरा तालुका (एकूण गावे – 186, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 185, तालुका पैसेवारी – 0.47) आणि भद्रावती तालुका (एकूण गावे – 162, पैसेवारी जाहीर करावयाची गावे – 149, तालुका पैसेवारी – 0.48).

०००००

No comments:

Post a Comment