Search This Blog

Tuesday, 13 January 2026

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप



जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप

चंद्रपूरदि. 13 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26 चे आयोजन ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात आलेजिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय बालगृहातील मुलांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा तसेच इतर मुलांसोबत स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावायासाठी चाचा नेहरू बालमहोत्सव घेण्यात आलाबक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला.

  पोलिस फुटबॉल मैदान येथे रंगलेल्या तीन दिवसीय कबड्डीखो-खोगोळा फेकधावणेरिलेकॅरमबुद्धिबळनिबंधवक्तृत्ववादविवादनृत्यगायन आदी जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी प्रमुख अतिथी म्हणून माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काठोळेबाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककरबालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकरसदस्या भावना देशमुखज्योत्स्ना मोहितकरअॅडमनिषा नखातेवनिता घुमेसंरक्षण अधिकारी कविता राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धातूनच यशस्वी व्यक्तिमत्व घडत असतेम्हणून स्पर्धेला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावायातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळेलअसे प्रतिपादन मुख्य न्याय दंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांनी केलेस्पर्धामध्ये विजेते स्पर्धक नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील चाचा नेहरू बाल महोत्सव 2025-26 स्पर्धेकरीता पात्र ठरले आहेत.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक अभिषेक मोहुर्ले यांनी तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी मानलेशनिवारी 10 जानेवारी ला बालकांची शैक्षणिक सहल बॉटनिकल गार्डन विसापूर बल्लारपूर येथे नेण्यात आलीबालमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मिनाक्षी भस्मेजिल्हा परिविक्षा अधिकारी मोरेश्वर झोडेविधी सल्लागार अनिल तानलेअधिक्षक हेमंत सवईदिवाकर महाकाळकरअतिशकुमार चव्हाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकरशामराव मोदिलवारजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयजिल्हा बाल संरक्षण कक्षचाइल्ड हेल्पलाइन चंद्रपूररेल्वे चाईल्ड हेल्पलाईन बल्लारपूरसखी वन स्टॉप सेंटरस्त्री आधार केंद्रकिलबिल दत्तक संस्थाजिजामाता वर्कींग वूमन होस्टेलजिल्हा सक्षमीकरण केंद्रस्वामी विवेकानंद बालगृह राजुरास्वामी विवेकानंद बालगृह नागभीड आदींनी महत्वाची भूमिका पार पाडली.

००००००

No comments:

Post a Comment