Search This Blog

Wednesday, 21 January 2026

तृतीयपंथी नागरिकांच्या तक्रारी व समस्या निवारणाकरीता हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध

 तृतीयपंथी नागरिकांच्या तक्रारी व समस्या निवारणाकरीता हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध

चंद्रपूरदि. 21 : तृतीयपंथीय समुदाय हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जातेत्यामुळे विकास प्रक्रियेपासून हा समुदाय दूर आहेतृतीयपंथी समुदायातील व्यक्तिंचे शासनामार्फत मूलभूत अधिकाराचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्याकरीता तृतीयपंथीय व्यक्त्ती (हक्काचे संरक्षणकायदा, 2019 नियम 2020 संपूर्ण देशात लागू झाला आहे.

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविणे, त्यांची ओळख निश्चित करणेयाकरिता केंद्र शासनाने नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहेतृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना आकस्मिक परिस्थितीत मदत मिळावी, त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे या करिता नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर या पोर्टलवर नॅशनल हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहेतृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींनी त्यांच्या तक्रारी व समस्यांच्या निराकरणाकरिता तसेच आकस्मिक स्थितीत मदत मिळणे करिता हेल्पलाईन क्रमांक 14427 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त (समाज कल्याणविनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment