Search This Blog

Wednesday, 28 October 2020

आत्मभान अभियान : व्हिडिओ स्पर्धेचा निकाल 29 ऑक्टोबरला




 

आत्मभान अभियान : व्हिडिओ स्पर्धेचा निकाल 29 ऑक्टोबरला

पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर: सामान्य नागरिकांमध्ये कोरोना विषाणूबद्दल जनजागृती व्हावी यासाठी लहान मुलांचा सहभाग असणारी व्हिडिओ स्पर्धा जिल्हा प्रशासनाने आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल दिनांक 29 ऑक्टोबरला जाहीर होणार असून राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

हाताची स्वच्छता, मास्क लावणे, शारिरीक अंतर, प्रशासनाच्या सुचना पाळणे, बाहेर गेल्यावर काळजी घेणे, बाजारात गर्दी न करणे अशा अनेक विषयाला अनुसरून व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मुलांनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा 3 ते 6, 7 ते 12 व 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती.

00000

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 12199 बाधित कोरोनामुक्त


 

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 12199 बाधित कोरोनामुक्त

जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू ;228 नव्याने पॉझिटिव्ह 

Ø बाधितांची एकूण संख्या 15277

Ø उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2851

चंद्रपूरदि. 28 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे चार मृत्यू झाले असून 228 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 277 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 151 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 199 झाली आहे. सध्या 2 हजार 851 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 17 हजार 696 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 878 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमूर तालुक्यातील 76 वर्षीय पुरुषबल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील 70 वर्षीय पुरुषब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील 72 वर्षीय पुरुष व भद्रावती येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 227 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 214तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली चारयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 124 पुरूष व 104 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 101पोंभूर्णा तालुक्यातील तीनबल्लारपूर तालुक्यातील आठमुल तालुक्यातील 22गोंडपिपरी तालुक्यातील दोनजिवती तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील 12ब्रह्मपुरी तालुक्यातील 27नागभीड तालुक्यातील 14,  वरोरा तालुक्यातील सात, भद्रावती तालुक्यातील आठसावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील सातराजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली 12 तर भंडारा येथील एक असे एकूण 228 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

इंदिरा नगर अयोध्या चौक परिसरदुर्गापुरशक्तिनगरजुनोना चौक बाबुपेठसंजय नगरबालाजी वार्ड,नकोडाघुग्घुसएकोरी वार्डशास्त्रीनगरअंचलेश्वर वार्ड, अरविंद नगरगौतम नगरपठाणपुरानगीना बाग,  चिचपल्लीऊर्जानगरसाईकृपा कॉलनी परिसरतुकूमइंदिरानगरपडोलीविठ्ठल मंदिर वार्डराजीव नगरवडगावस्नेह नगरसुशील नगरशिवाजीनगर, घुटकाळा वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

वरोरा तालुक्यातील दत्त मंदिर वार्डशांतीवन लेआउट परिसरमाढेळीबोर्डाजिजामाता वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मेढंकीशेष नगरविद्यानगरशांतीनगरअरेर नवरगावहनुमान नगरभवानी वार्डगजानन नगरबोंडेगावपेठ वार्डप्रबुद्ध नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

 

भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणाकटारिया लेआउटशिवाजीनगरचंडिका वार्ड, डिफेन्स चांदा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडीपरिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मुसाभाई नगरकिटाळीबाळापुरअनुसया नगरतळोधीहनुमान मंदिर वलनीगोवर्धन चौक परिसर,कोथुर्णाभागातून बाधित पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील  गडचांदूरपार्डीमाणिक गड कॉलनी परिसरआंबेडकर भवन परिसर वैशाली नगर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील नागाळाचितेगावडोंगरगावचिंचाळा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूरदादाभाई नौरोजी वार्डरेल्वे वार्ड, श्रीराम वार्डकोठारी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

00000

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


 पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूरदि. 28 ऑक्टोंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार 29 ऑक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 29 ऑक्टोबरला सकाळी 10:30 वाजता खांबाळा ता. वरोरा येथे नागपूरहून आगमन व आरोग्य उपकेंद्रखांबाळाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 10:45 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळाखांबाळा येथील दोन खोली शाळा इमारतीच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहतील. सकाळी 11:00 वाजता खांबाळा ता. वरोरा येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

दुपारी 12:00 वाजता शासकीय विश्रामगृहचंद्रपूर, येथे आगमन व राखीव. दुपारी 1:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर, येथे व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थिती. दुपारी 2.50 वाजता नियोजन भवनचंद्रपूर येथे कोविड-19 बाबत मोबाईल टेस्टिंग व्हॅन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील.

दुपारी 3:00 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5:30 वाजता नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. सायंकाळी 7:00 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

जिल्ह्यात सव्वा लाखाचा अवैध दारूसाठा जप्त

 


जिल्ह्यात सव्वा लाखाचा अवैध दारूसाठा जप्त

Ø राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई

चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोंबर: जिल्ह्यात काल राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे धाड टाकून रुपये 1 लक्ष 24 हजार 800 किंमतीचा अवैध दारू साठा जप्त केला.

दारुच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक नेहमी  गस्तीवर असते. या पथकाला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी पहाटे चार वाजता महाकाली मंदिर सुपर मार्केट वॉर्ड चंद्रपूर येथील राजेश दरबारसिंग ठाकुर यांच्या घरी धाड टाकली. यावेळी त्यांचेकडून रुपये 1 लक्ष 24 हजार 800 किमतीच्या रॉकेट देशी दारू 90 मिली क्षमतेच्या एकूण 48 बॉक्स जप्त करण्यात आले.

 राजेश दरबार सिंग ठाकूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई) अन्वये कारवाई करून अटक करण्यात आली आहे. यासंबधात पुढील तपास सुरू आहे. वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुरचे अधिक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपूरगडचिरोली विभागाचे प्रभारी निरीक्षक अमित क्षिरसागर तसेच विभागाचे पोलीस शिपाई चेतन अवचट, सुदर्शन राखुंडे व जगन पुट्टलवार यांनी सदर कार्यवाही पार पाडली.

00000

Tuesday, 27 October 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 12048 बाधित झाले बरे

 


जिल्ह्यात आतापर्यंत 12048 बाधित झाले बरे

गेल्या 24 तासात 188 नव्याने बाधित एका बाधिताचा मृत्यू

Ø उपचार घेत असलेले बाधित 2778

Ø जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 15049

चंद्रपूरदि. 27 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एका बाधिताचा मृत्यू झाला असून 188 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 49 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  188 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 48 झाली आहे.  सध्या 2 हजार 778 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 16 हजार 762  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख हजार 167 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यु झालेल्या बाधितामध्ये चंद्रपुर शहरातील छत्रपती नगर येथील 73 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 223 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 210, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली चारयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 110 पुरूष व 78 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 78 बाधितबल्लारपूर तालुक्यातील पाचचिमूर तालुक्यातील तीनमुल तालुक्यातील सहाजिवती तालुक्यातील चारकोरपना तालुक्यातील आठब्रह्मपुरी तालुक्यातील आठनागभीड तालुक्यातील दोन,  वरोरा तालुक्यातील 23,भद्रावती तालुक्यातील 10, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील 20, राजुरा तालुक्यातील 12गडचिरोली सहाभंडारा व यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 188 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परीसरातील लालपेठभिवापुर वॉर्डस्वस्तिक नगरमहाकाली वार्डगौतम नगरबापट नगरबाबुपेठलोहारावाघोबा चौक तुकुमदुर्गापुरमहाकाली कॉलनी परिसरऊर्जानगरविश्वकर्मा नगरसुशिल नगरगजानन मंदिर परिसरबालाजी वार्डशिवाजीनगरशालिनीनगरवडगावघुग्घुसआंबेडकर नगरश्याम नगररामनगरनगीना बागपडोलीतीर्थरूप नगरशास्त्रीनगर भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

वरोरा तालुक्यातील  आशीर्वाद नगरचिकणीआझाद वार्डसुभाष वार्डवाघनखकटारिया ले आऊट परिसरअभ्यंकर वार्डविठ्ठल मंदिर वार्डआनंदवन परिसरआशीर्वाद लेआउट परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधीनगरपटेल नगरविद्यानगरगाडगेबाबा नगरपेठवार्ड परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगरझाडे प्लॉट परिसरराजवाडा टाऊनशिपसुरक्षा नगरशिंदे लेआउट परिसरपिपरबोडी,परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

 

राजुरा तालुक्यातील सातरीसास्तीदोहेवाडीशिवाजीनगरकिसान वार्ड, मज्जिद वार्डडब्ल्यूसीएल कॉलनी परिसरराजीव गांधी चौक  भागातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील शिवनीदेलनवाडीपळसगावनवरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधीसुलेझरी,भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील माणिक गड कॉलनी परिसरगडचांदूर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील मारोडावार्ड नंबर 14 परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील  साईबाबा वार्डबिल्ट कॉलनी परिसरसुभाष वार्डविसापूर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील पिंपळनेरीभागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000