Search This Blog

Wednesday 28 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 12199 बाधित कोरोनामुक्त


 

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 12199 बाधित कोरोनामुक्त

जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू ;228 नव्याने पॉझिटिव्ह 

Ø बाधितांची एकूण संख्या 15277

Ø उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2851

चंद्रपूरदि. 28 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे चार मृत्यू झाले असून 228 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 277 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 151 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 199 झाली आहे. सध्या 2 हजार 851 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 17 हजार 696 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 878 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमूर तालुक्यातील 76 वर्षीय पुरुषबल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील 70 वर्षीय पुरुषब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील 72 वर्षीय पुरुष व भद्रावती येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 227 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 214तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली चारयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 124 पुरूष व 104 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 101पोंभूर्णा तालुक्यातील तीनबल्लारपूर तालुक्यातील आठमुल तालुक्यातील 22गोंडपिपरी तालुक्यातील दोनजिवती तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील 12ब्रह्मपुरी तालुक्यातील 27नागभीड तालुक्यातील 14,  वरोरा तालुक्यातील सात, भद्रावती तालुक्यातील आठसावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील सातराजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली 12 तर भंडारा येथील एक असे एकूण 228 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

इंदिरा नगर अयोध्या चौक परिसरदुर्गापुरशक्तिनगरजुनोना चौक बाबुपेठसंजय नगरबालाजी वार्ड,नकोडाघुग्घुसएकोरी वार्डशास्त्रीनगरअंचलेश्वर वार्ड, अरविंद नगरगौतम नगरपठाणपुरानगीना बाग,  चिचपल्लीऊर्जानगरसाईकृपा कॉलनी परिसरतुकूमइंदिरानगरपडोलीविठ्ठल मंदिर वार्डराजीव नगरवडगावस्नेह नगरसुशील नगरशिवाजीनगर, घुटकाळा वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

वरोरा तालुक्यातील दत्त मंदिर वार्डशांतीवन लेआउट परिसरमाढेळीबोर्डाजिजामाता वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मेढंकीशेष नगरविद्यानगरशांतीनगरअरेर नवरगावहनुमान नगरभवानी वार्डगजानन नगरबोंडेगावपेठ वार्डप्रबुद्ध नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

 

भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणाकटारिया लेआउटशिवाजीनगरचंडिका वार्ड, डिफेन्स चांदा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडीपरिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मुसाभाई नगरकिटाळीबाळापुरअनुसया नगरतळोधीहनुमान मंदिर वलनीगोवर्धन चौक परिसर,कोथुर्णाभागातून बाधित पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील  गडचांदूरपार्डीमाणिक गड कॉलनी परिसरआंबेडकर भवन परिसर वैशाली नगर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील नागाळाचितेगावडोंगरगावचिंचाळा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूरदादाभाई नौरोजी वार्डरेल्वे वार्ड, श्रीराम वार्डकोठारी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment