Search This Blog

Sunday 11 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 8843 बाधित कोरोनामुक्त

 


चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 8843 बाधित कोरोनामुक्त

बाधितांची एकूण संख्या 12077

उपचार सुरु असणारे बाधित 3050

जिल्ह्यात 24 तासात 187 बाधित तीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि.11 ऑक्टोंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसारजिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 187 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 12 हजार 77 वर पोहोचली आहे.  8 हजार 843 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 50 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येसावली येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 7 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू भानापेठ वार्डचंद्रपुर येथील 69 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 10 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरतिसरा मृत्यू  सौगत नगर तुकुमचंद्रपुर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला ऑक्टोबरला मानवटकर हॉस्पीटलचंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. तरतिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने मानवटकर हॉस्पीटलचंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 184 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 175, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 65, बल्लारपूर तालुक्यातील 15, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील 11, गोंडपिपरी तालुक्यातील पाचजिवती तालुक्यातील एक,  कोरपना तालुक्यातील पाचब्रह्मपुरी तालुक्यातील 22नागभीड तालुक्यातील 11,  वरोरा तालुक्यातील 20भद्रावती तालुक्यातील 10सावली तालुक्यातील तीन,  सिंदेवाही तालुक्यातील 9राजुरा तालुक्यातील सात तर गडचिरोली व यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 187 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील अंचलेश्वर वॉर्डसंजय नगरनगीनाबागरयतवारी कॉलनी परिसरभानापेठ वार्डशक्तिनगरबाबूपेठलालपेठ कॉलरी परिसरसंत नगर दुर्गापुरतुकूमवैशाली नगरभिवापुर वॉर्डजटपुरा गेटसिंधी कॉलनी परिसररामनगरकृष्णा नगरइंदिरानगर भागातून बाधित पुढे आले आहे.

 

 

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्डकन्नमवार वार्डकळमनागोकुळ नगरसाईबाबा वार्डविवेकानंद वार्डडब्ल्यूसीएल कॉलनी परिसरविद्यानगरविसापूर परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विवेकानंदनगरचुनाभट्टी वार्डबामणवाडागोवरी कॉलनी परीसर भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील गांधिनगरआनंदवनबावणे लेआउट परिसरअभ्यंकर वार्डचिनोरादेशपांडे लेआउटजिजामाता वार्डशांतीवन लेआउट परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विदर्भ टाउन परिसर,खंडाळाज्ञानेश नगरदेलनवाडी वार्डशांतीनगरकुर्झामालडोंगरी,गुजरी वार्डशेष नगरमेंढकीखेड मक्ता भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरीझिंगोजी वार्डकिल्ला वार्डशिवाजीनगरश्रीकृष्णा नगरबाजार वार्डपरिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील काचेपारनवरगावलोनवाहीगुंजेवाहीपळसगावनांदगाव परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील कोजबी,ओवाळाचावडेश्वरीगिरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.मुल तालुक्यातील जूनासुर्लाराजगड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूरपिंपळगावउपरवाहीमाणिक गड कॉलनी परिसर भागातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शिवाजी चौकइंदिरानगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment