Search This Blog

Thursday 8 October 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 8369 बाधित कोरोनातून झाले बरे

 

जिल्ह्यात आतापर्यंत 8369 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3074

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 11623 वर

24 तासात 151 नवीन बाधितएका बाधिताचा मृत्यू

चंद्रपूरदि. 8 ऑक्टोंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 151 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 11 हजार 623 वर गेली आहे. आतापर्यंत 8 हजार 369 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 74 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितामध्ये, इंदिरा नगरचंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 4 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधिताला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 180 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 171तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 59बल्लारपूर तालुक्यातील चारचिमूर तालुक्यातील दोनमुल तालुक्यातील 14गोंडपिपरी तालुक्यातील पाचजिवती तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील चार,  नागभीड तालुक्‍यातील 9वरोरा तालुक्यातील 11 ,भद्रावती तालुक्यातील 14सावली तालुक्यातील 11,  सिंदेवाही तालुक्यातील 12राजुरा तालुक्यातील एकगडचिरोली दोन तर यवतमाळ येथील एक असे एकूण 151 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील भिवापूर वार्डविवेकानंदनगर वडगावदादमहल वार्डगंज वार्डरयतवारी कॉलनी परिसरदुर्गापुरनगीना बाग,घुटकाळा वार्डतुकुमअंचलेश्वर वार्डबाबुपेठदत्तनगरसावरकर नगरघुगुसहनुमान मंदिर परिसरसिस्टर कॉलनीविठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्डविद्या नगर वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विरुर भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील बावणे लेआउट परिसरआनंदवनआंबेडकर वार्डविनायक लेआउट परिसरसुभाष वार्डचिनोराजिजामाता वार्डमाढेळी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधिनगरमेढंकीपिंपळगाव भोसले परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील बाजार वार्डपिपरबोरीझिगुंजी वार्ड, गौतम नगर झाडे प्लॉट परिसर, श्रीराम नगर भागातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाववार्ड नंबर 8कापसी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील पळसगावरत्नापूरकाचेपार भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवखळा, किटाळी, आकापुर, पार्डी, परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्डठक्कर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील चिरोली  परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment