Search This Blog

Thursday 29 October 2020

राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर दुसरा जिल्हा





 

राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर दुसरा जिल्हा

पालकमंत्री नाविजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 38 रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Ø तातडीची वैद्यकीय सेवा पुरविण्यास मिळणार मदत

चंद्रपूर, दिनांक 29 ऑक्टोबर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेकोरोना काळात तसेच गंभीर परिस्थितीत रुग्णाला कमीतकमी वेळेत दवाखान्यात पोहचविण्यासाठी  तातडीचे उपचार मिळण्यासाठी लाईफ सपोर्टची पुर्ण व्यवस्था असलेल्या 38 अद्यावत रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यात येत आहेयामुळे चंद्रपुर जिल्हा हा राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला जिल्हा ठरला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन परीसरात या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पार पडलायावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुलेआमदार प्रतिभा धानोरकरआमदार सुभाष धोटेआमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी अजय गुल्हानेमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेअतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरजिल्हा शल्य चिकीत्सक डॉनिवृत्ती राठोडशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉअरुण हुमणेनिवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाडउपविभागिय अधिकारी रोहन घुगेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉराजकुमार गहलोत प्रामुख्याने उपस्थ‍ि होते.

जिल्ह्याच्या खनिज विकास निधीतून सर्व सुविधायुक्त 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेतया रुग्णवाहीका वातानुकुलीत असून अत्यावश्यक सोईसुविधांनी सुसज्ज आहेतया रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय  प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणार आहेतयाशिवाय सहा रुग्णवाहीका वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात येणार आहेतजिल्हाभरात हेल्थ मिशन राबविणे  ग्रामीण पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा अद्यावत करण्याचा मानस असल्याचे नावडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment