Search This Blog

Monday 5 October 2020

पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत घसरण कायम 24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद


पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत घसरण कायम

24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद;

Ø उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3273

Ø जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 11118 वर

Ø गेल्या 24 तासात सात बाधितांचा मृत्यू

 

चंद्रपूरदि. 5 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. तरीसुद्धा कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडित व्हावी यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे. बाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी सदैव मास्कचा वापर करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 92 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 11 हजार 118 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 7 हजार 671 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 273 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात सात बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येरामपूरराजुरा येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 30 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू नगीना बागचंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 30  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू नेहरू नगरचंद्रपुर येथील  57 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू हनुमान नगरब्रम्हपुरी येथील 52 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

पाचवा मृत्यू नगीना बागचंद्रपुर येथील 65 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 27 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

सहावा मृत्यू मुक्ती कॉलनी परिसरचंद्रपुर येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 4 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरसातवा मृत्यू विश्वकर्मा नगरभद्रावती येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला कोलसिटी हॉस्पीटलचंद्रपुर येथे भरती करण्यात आले होते. अनुक्रमे पहिल्या ते पाचव्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. सहाव्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाबन्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. सातव्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाबन्युमोनियाचा आजार असल्याने  कोलसिटी हॉस्पीटलचंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 174 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 165, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 62, बल्लारपूर तालुक्यातील दोनमुल तालुक्यातील 11, कोरपना तालुक्यातील एक,  वरोरा तालुक्यातील तीनभद्रावती तालुक्यातील आठसावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील तीनगडचिरोली येथील एक असे एकूण 92 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातून स्नेह नगरअंचलेश्वर वार्डरामनगरआकाशवाणी रोडएकोरी वार्डसाईबाबा वार्डसिव्हिल लाईनकोतवाली वार्डबाबुपेठस्वस्तिक नगरश्याम नगरसरकार नगरतुकूममहाकाली वार्डसिस्टर कॉलनी परीसरबापट नगरजीएमसी परिसरबाजार वार्डलालपेठ कॉलनी परीसरश्रीराम वार्डवृंदावन नगरसावरकर नगरगंजवार्डभाना पेठ वार्डइंदिरानगरगांधी चौकजगन्नाथ बाबा नगरभिवापुर वॉर्डशिवाजीनगरदाताळा रोड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील गांधी चौक भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर सहावार्ड नंबर 12, वार्ड नंबर 15, राजुरी परिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.भद्रावती तालुक्यातील झाडे प्लॉट परिसरसुमठाणा परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगावनवरगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment