Search This Blog

Friday 23 October 2020

कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


 

कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 23 ऑक्टोबर: सद्य परिस्थीतीतील वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावासाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून खालील उपाययोजना कराव्यात,असे आवाहन किटकशास्त्र, विभाग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

 

 

 

अशा कराव्यात उपाययोजना:

फेरोमेन सापळयाचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे.

फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहाय्याने डोमकळया (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझॉडिरेक्टीन 0.03 (300 पीपीएम) 50 मिली किंवा 0.15 टक्के (1500पीपीएम) 25 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरून किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडक बोंड व अळ्याची संख्या मोजूनती दोन किडक बोंड किंवा दोन पांढूरक्या, गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून पुढील प्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

थायोडीकार्ब 75 टक्के डब्ल्युपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्याच्यावर आहे अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणुन खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के + डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरॉँट्रानिलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायहॅलोश्रीन 4.6 टक्के 5 मिली किंवा किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामाप्रिड 7.7 टक्के 10 मिली.

00000

No comments:

Post a Comment