Search This Blog

Thursday, 1 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 6190 कोरोना मुक्त

 


चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 6190 कोरोना मुक्त

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 10514

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 4167

24 तासात 272 बाधित आले पुढेपाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 1 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 272 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 10 हजार 514 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 6 हजार 190 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 4 हजार 167 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, विवेकानंद नगरचंद्रपुर येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू महाकाली कॉलरीचंद्रपुर येथील 61 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 30 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू भिसीचिमूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू उत्तम नगरचंद्रपुर येथील 57 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 22 सप्टेंबरला कोलसिटी हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

तरपाचवा मृत्यू जीएमसी परिसरचंद्रपूर येथील 80 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होतातिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. चवथ्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व श्वसनाचा आजार असल्याने कोलसिटी हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. तरपाचव्या बाधिताला कोरोनासह हृदय विकारन्युमोनियाउच्चरक्तदाब असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 157 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 148, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 121, बल्लारपूर तालुक्यातील 16, चिमूर तालुक्यातील 8, मुल तालुक्यातील 23, गोंडपिपरी तालुक्यातील दोनकोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील 10,  नागभीड तालुक्‍यातील 15, वरोरा तालुक्यातील 20, भद्रावती तालुक्यातील 13, सावली तालुक्यातील सहासिंदेवाही तालुक्यातील 18, राजुरा तालुक्यातील सातगडचिरोली येथील एक तर वणी -यवतमाळ येथील दोन असे एकूण 272  बाधित पुढे आले आहे.

 

 

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील जल नगर वार्डरामनगर वार्डअंचलेश्वर गेट परिसरशास्त्रीनगरभिवापूरसुमित्रा नगर तुकूमबाबुपेठसंजय नगरबाजार वार्डपठाणपुरा वार्डनगीना बागइंदिरानगरऊर्जानगरलालपेठबालाजी वार्डविठ्ठल मंदिर वार्डविवेकानंद नगरदाताळाजगन्नाथ बाबा नगरहनुमान वार्ड भागातून  पॉझिटीव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील गणपती वार्डगौरक्षण वार्ड, टिळक वार्डरवींद्र नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील जवाहर नगर राजुराफॉरेस्ट कॉलनी परिसरपेठ वार्डरामनगरधोपटाळाचुनाभट्टी भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील सुमठाणा, आझाद वार्डकमला नेहरू वार्डमालवीय वार्डकेशवनगरइंद्रप्रस्थ नगरसरदार पटेल वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील जानी वार्डओम नगरपटेल नगरसंत रविदास चौक परिसरझाशी राणी चौक परिसरातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील जुना सुमठाणागौतम नगरगुरु नगरमंजुषा लेआउट परिसरसूर्य मंदिर वार्डएकता नगरचारगाव कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील गोवर्धन चौकमिंथुरसावरगावमेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील मोठेगावनूतन आदर्श कॉलनी परिसरटिळक वार्डवडाळा पैकुशंकरपुर भागातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूरआवारपुरपंचशील वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगावलोनवाहीनवरगावगुंजेवाही भागातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील करंजीकुडे सावलीपरिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील आकापुरविवेक नगरवार्ड नंबर 17 भागातून बाधित पुढे आले आहे.

000000

No comments:

Post a Comment