Search This Blog

Thursday 8 October 2020

शेतीवर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण

 


शेतीवर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षण

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.7 ऑक्टोबर  :  महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्र चंद्रपूरद्वारे  10 वी  पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक युवतीकरीता 12 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2020 या  कालावधीमध्ये ऑनलाईन शेतीवर आधारीत उद्योगप्रशिक्षण  कार्यक्रम आयोजित  करण्यात येत आहे. तरी युवक युवतींनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड यांनी केले आहे.

             सदर कार्यशाळेत ऑनलाईन शेतीवर आधारीत विविध उद्योगसंधी,अन्न प्रक्रियावर आधारीत उद्योगसंधी डिजीटल मार्केटिंग,ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंगदुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योगातील उद्योगसंधीफळ प्रक्रियातील उद्योगसंधीपशुसंवर्धवर आधारीत उद्योगसंधी, उद्योजकता व उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, शासकीय कार्यालयातील विविध योजनाउत्पादक निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने नाहरकत प्रमाणपत्र व नोंदणीजीएसटी नोंदणीविपणन व्यवस्थापन उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी  करणे  इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक युवतीनी www.mced.co.in या वेबसाईटवर 11 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी  प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोडमो.न. 9403078773, 07172-274416 व  कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे,  मो. न. 9011667717 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment