Search This Blog

Monday 19 October 2020

वनमजूर, वनपालास पिंजऱ्यात ठेवण्यात आलेले नाही: अरविंद मुंढे

 वनमजूरवनपालास पिंजऱ्यात ठेवण्यात आलेले नाहीअरविंद मुंढे

मध्य चांदा वनविभागाची माहिती

 

चंद्रपूरदि. 19 ऑक्टोबर: राजुरा वनपरिक्षेत्रात आर.टी-1 वाघास जेरबंद करण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेमध्ये कोणत्याही बकरीऐवजी वनमजुर व वनपालास पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेले नाही, कर्मचाऱ्यास वाघाचा मागोवा घेण्यासाठी व त्यांच्या स्वरक्षणासाठी वेगळ्या जागेवर पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी लांब अंतरावर बसविण्यात आलेले होतेअशी माहिती  मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी दिली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारीराजुरा यांनी वन कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या पत्राचा गैरअर्थ घेण्यात आला आहे. त्या आधारावर विविध वृत्तपत्रांमध्ये बकरी ऐवजी वनमजूरवनपालास पिंजऱ्यात ठेवण्यात आले अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाले आहे. वन कर्मचारी यांना वाघाला पकडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात बसविण्यात आले नाही.

राजुरा वनपरिक्षेत्रात आर.टी-1 वाघास जेरबंद करण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेमध्ये कोणत्याही बकरीऐवजी वनमजुर व वनपालास पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेले नाहीत्यांना वाघाचा मागोवा घेण्यासाठी व त्यांच्या स्वरक्षणासाठी वेगळ्या जागेवर पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी लांब अंतरावर बसविण्यात आलेले होते. या मोहिमेमध्ये सर्व वन कर्मचारी यांच्या सुरक्षिततेवर पुर्णपणे लक्ष दिले जात असल्याचा खुलासा मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी केला आहे. तसेच चुकीची माहिती पसरवू नये असे आवाहन श्री.मुंढे यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment