Search This Blog

Monday 12 October 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 8977 बाधित कोरोनातून झाले बरे


 जिल्ह्यात आतापर्यंत 8977 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3069

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 12233 वर

24 तासात 156 नवीन बाधिततीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 12 ऑक्टोंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 156 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 12 हजार 233 वर गेली आहे. आतापर्यंत 8 हजार 977 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 69 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, संतोषी माता वार्डबल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 4 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू बाबुपेठचंद्रपुर येथील 56 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 24 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरतिसरा मृत्यू शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परीसरचंद्रपुर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 4  ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. तीनही बाधितांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 187 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 178, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 80, पोंभूर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील दोनचिमूर तालुक्यातील 13, मुल तालुक्यातील 10, कोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील 23, नागभीड तालुक्यातील पाच,  वरोरा तालुक्यातील तीनभद्रावती तालुक्यातील तीनसिंदेवाही तालुक्यातील 11, यवतमाळ एक तर गडचिरोली येथील दोन असे एकूण 156 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील अंचलेश्वर वॉर्डराम नगर, घुटकाळा वार्डनगीना बागवडगावभानापेठ वार्डदादमहलफुटाळाऊर्जानगरपडोलीबाबुपेठबंगाली कॅम्प परिसरएकोरी वार्डजटपुरा गेट परिसरसरकार नगरबागला नगरसिस्टर कॉलनी परिसरभिवापुरकृष्णा नगरशिवाजीनगर घुग्घुस, विवेक नगरअशोक नगररयतवारी कॉलरी परिसरसुमित्रा नगरबापट नगरमित्र नगर भागातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील मानोरागिलबिली परिसरातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील आंबेडकर चौक परिसरआनंदवन परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरीकुरझादेलनवाडीशेष नगर,खेडश्री नगर पेठ वार्ड,भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगावपळसगावलोनवाहीकोसबीवासेराजीवनापूरदेवाडा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील ओवळागांधी चौक गिरगाव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मुल तालुक्यातील आंबेडकर वार्डचिरोलीजूनासुर्ला परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील गुरुदेव वार्डमदनापूरजांभुळ घाट,भिसी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment