Search This Blog

Tuesday 13 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 9359 बाधितांना डिस्चार्ज

 

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 9359 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 12431उपचार सुरु असणारे बाधित 2882

जिल्ह्यात 24 तासात 198 बाधित तीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 13 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 198 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 12 हजार 431 झाली आहे. यापैकी 9 हजार 359 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 882 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासामध्ये तीन कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्येलालपेठ कॉलरीचंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 10 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू सावली येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरतिसरा मृत्यू सिंदेवाही येथील 54  वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 12 ऑक्टोबरला शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. तीनही बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 190 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 181तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 60बल्लारपूर तालुक्यातील 15चिमूर तालुक्यातील दोनमुल तालुक्यातील 14गोंडपिपरी तालुक्यातील तीनकोरपना तालुक्यातील 9ब्रह्मपुरी तालुक्यातील 16नागभीड तालुक्यातील 29,  वरोरा तालुक्यातील 22भद्रावती तालुक्यातील दोनसावली तालुक्यातील एकसिंदेवाही तालुक्यातील 12राजुरा तालुक्यातील सहातेलंगाणा एक तर गडचिरोली येथील सहा असे एकूण 198 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील तुकुमजगन्नाथ बाबा नगर, घुटकाळाभिवापूर वार्डअंचलेश्वर वार्डऊर्जानगरसरकार नगररामनगरकृष्णा नगरभिवापूर वार्डघुग्घुससमाधी वार्डजलनगरसिस्टर कॉलनी परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील पेपर मिल परिसरबालाजी वार्डदादाभाई नौरोजी वार्डफुलसिंग नाईक वार्डनांदगाव पोडेराणी लक्ष्मी वार्डसरदार पटेल वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विवेकानंदनगरशिवाजीनगरजवाहर नगर भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील सहारा पार्कमालवीय वार्डबावणे लेआउट परिसरविठ्ठल मंदिर वार्डबोर्डाराम मंदिर वार्डजिजामाता वार्डअभ्यंकर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कपिलवास्तू नगरविदर्भ टाऊन परिसरपद्मापूर भुजओमकार नगरशांतीनगरटिळक नगरविद्यानगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील ओमकार नगरअशोक नगरसुमठाणाशिवाजीनगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, पळसगावरत्नापूर हेटीवासेरा भागातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणाबाळापुरतळोधीमेंढाकन्हाळगावकोजबीगिरगावमिडांळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील क्रांतीनगरचिखलापुरभागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील कारवां,राजोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment