Search This Blog

Friday 9 October 2020

फिजिकल फायलिंग सुविधेला 31 ऑक्टोबर पर्यंत अंतीम मुदतवाढ

 फिजिकल फायलिंग सुविधेला 31 ऑक्टोबर पर्यंत अंतीम मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 9 ऑक्टोबर:  ई-फायलिंग सुविधेची माहिती कर्जदार व बँक इत्यादींना होण्यास आणखी 15 ते 20 दिवस लागण्याची शक्यता विचारात घेऊन संबंधितांची गैरसोय टाळण्यासाठी फिजिकल फायलिंग सुविधेला दि. 31 ऑक्टोबर 2020 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

दि. 31 ऑक्टोबर 2020 रोजी कार्यालयीन वेळेनंतर फिजिकल ई-फाईलींगची पिडीई बंद करण्यात येईल. त्यापूर्वी डेटा एंट्री केलेल्या प्रकरणांमध्येदुय्यम निबंधक कार्यालयात फिजिकल फायलिंग दि. 31 ऑक्टोबर 2020 नंतर देखील दि. 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत कर्ज व्यवहारापासून 30 दिवसांची मुदत शिल्लक असेल तर करता येईल. दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी कार्यालयीन वेळेनंतर दुय्यम निबंधक कार्यालयातील फिजिकल फाइल प्रणाली बंद करण्यात येईल. सदरची मुदतवाढ अंतिम रित्या देण्यात येत असून सह जिल्हा निबंधकदुय्यम निबंधक यांनी याबाबत व्यापक प्रसिद्धी देऊन जिल्ह्यातील सर्व बँक व इतर घटकांना याबाबत अवगत करावे तसेच ई-फायलिंग आवृत्ती 2 बाबत प्रशिक्षण सत्रे आयोजित करावीत असे आवाहन चंद्रपूरचे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अ.प्र. हांडा यांनी केले आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज करताना कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर सुचना संदर्भीय पत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. सदर सूचना तत्कालीन परिस्थितीनुरूप देण्यात आलेल्या होत्या.

तथापि कोरोनाविषाणू चा प्रादुर्भावामुळे पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून संदर्भीय पत्रकान्वये नोटीस ऑफ इंटिमेशन फिजिकल फाईलिंग सुविधेला दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

फिजिकल फाईलिंग व्यवस्था बंद केल्यामुळे संबंधित कर्जदाराची गैरसोय होऊ नये याकरिता ई- फाईलिंग आवृत्ती 2 ही ऑनलाईन सुविधा विभागाने संदर्भीय पत्रकान्वये उपलब्ध करून दिली आहे. सदर सुविधेचा वापर मुंबईमुंबई उपनगर व पुणे या जिल्ह्यांमध्ये दि. 1 जुलै 2020 पासून सुरू करण्यात आला आहे. तसेच इतर सर्व जिल्ह्यांमधील दुय्यम निबंधक यांचे प्रशिक्षण माहे सप्टेंबर 2020 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे व त्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुविधा दिनांक 1ऑक्टोंबर 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

000000

No comments:

Post a Comment