Search This Blog

Friday, 30 October 2020

ग्रामीण भागातील 10 हजार दिव्यांगांच्या बँक खात्यावर रुपये 500जमा

ग्रामीण भागातील 10 हजार दिव्यांगांच्या बँक खात्यावर रुपये 500 जमा

कोविड-19 पार्श्वभुमीवर जि.प. समाजकल्याण विभागाचा निर्णय

चंद्रपूरदि. 30 ऑक्टोबर: कोरोना विषाणु प्रादुर्भाव कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त दिव्यांगांना त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करता याव्या याकरीता आर्थिक मदत पुरविणेकरीता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले व समाज कल्याण समितीचे सभापती नागराज गेडाम यांनी दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे ही योजना राबविण्याबाबत समाज कल्याण विभागाला निर्देश दिलेत.

या योजने अंतर्गत उपलब्ध निधीच्या मर्यादेनूसार चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 10 हजार दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी रु.500 थेट जमा करण्यात येत आहेतअशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल जाधव यांनी दिली.

000000

No comments:

Post a Comment