Search This Blog

Thursday 15 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 9683 बाधित कोरोनामुक्त


 चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 9683 बाधित कोरोनामुक्त

बाधितांची एकूण संख्या 12945

उपचार सुरु असणारे बाधित 3067

जिल्ह्यात 24 तासात 199 बाधित दोन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि.15 ऑक्टोंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसारजिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 199 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 12 हजार 945 वर पोहोचली आहे.  9 हजार 683 बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 67 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येरामपुर राजुरा येथील 80 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 7 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरदुसरा मृत्यू समाधी वार्डचंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 ऑक्टोबरला श्वेता हॉस्पिटल,चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.पहिल्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाधिताला कोरोनासह उच्च रक्तदाबमधुमेहाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटलचंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 195 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 186तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 79 बाधितबल्लारपूर तालुक्यातील चारचिमूर तालुक्यातील सातमुल तालुक्यातील 41,  कोरपना तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील 18,  नागभीड तालुक्‍यातील 20, वरोरा तालुक्यातील पाच, भद्रावती तालुक्यातील सातसावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील सहाराजुरा तालुक्यातील सहातर गडचिरोली येथील दोन असे एकूण 199  बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील रामनगरबालाजी वार्डजगन्नाथ बाबा नगरगंजवार्डबाबुपेठजटपुरा गेटतुकूमछत्रपती नगरसिंधी कॉलनी परिसरनगीना बागइंदिरानगरकृष्णा नगरचिचपल्लीगौतम नगरमित्र नगरविश्वकर्मा नगरऊर्जानगरदुर्गापुरमहाकाली वार्डअंचलेश्वर वार्डविवेक नगरसुभाष वार्डभिवापुर वॉर्ड भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील विवेकानंद वार्डबामणीबिल्ट कॉलनी परिसरदूधोलीपरिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सोमनाथपूर वार्डचरडीजवाहर नगर भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड,बोर्डाचैतन्य नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदगाव,नान्होरीबोडधाफुलेनगरतळोधी बाळापुरटिळक नगरखेडसमता कॉलनी परिसरखरकाडाशेषनगरज्ञानेश नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगरमाजरी वस्ती परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील तेरोडा भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील खैरी,मिनघरी,भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणाकानपागिरगाव,कोजबीगांधी चौक परिसरमहात्मा चौकआंबेडकर चौक परिसरकोहाडी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्डमालेवाडागुरुदेव वार्डचिखलापारटीचर कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.मुल तालुक्यातील मारोडाराजगडजूनासुर्लाचिखलीकारवाराजोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment