Search This Blog

Saturday 24 October 2020

मागील 24 तासात 302 कोरोनामुक्त


 मागील 24 तासात 302 कोरोनामुक्त

197 नव्याने पॉझिटिव्ह चार बाधितांचा मृत्यू

 

Ø आतापर्यंत 11439 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2928

Ø एकूण बाधितांची संख्या 14584

चंद्रपूरदि. 24 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 302 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 197 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील 27 वर्षीय पुरुषजुनोना चौक येथील 68 वर्षीय महिलाचिमूर येथील 56 वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील 60वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 217 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 205, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 197 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 14 हजार 584 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 302 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 11 हजार 439 झाली आहे. सध्या 2 हजार 928 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 14 हजार632 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 98 हजार 556 नमुने निगेटीव्ह आले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 197 बाधितांमध्ये 108 पुरुष व 89 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 67, पोंभुर्णा तालुक्यातील 11, बल्लारपूर तालुक्यातील सहा,  मुल तालुक्यातील 35गोंडपिपरी तालुक्यातील पाचजिवती तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील सहाब्रह्मपुरी तालुक्यातील 11,  नागभीड तालुक्‍यातील 16, वरोरा तालुक्यातील 13,भद्रावती तालुक्यातील 11, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील तीनराजुरा तालुक्यातील तीनगडचिरोली सात तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण 197 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील  भानापेठ वार्डरयतवारी कॉलरी, मार्डासुभाष नगरदुर्गापुरस्नेहनगरजुनोना चौक परिसरभिवापुर वॉर्डलखमापूरजलनगरबालाजी वार्ड,वडगावराष्ट्रवादी नगरहनुमान नगरतीर्थरूप नगरतुकूमसरकार नगरगौतम नगरमाता नगरइंदिरानगरबापट नगरबालाजी वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बामणीदूधोलीकोठारी भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील  आनंदवन परिसरबावणे लेआउट परिसरहनुमान वार्डसोईट परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगरशेष नगरदेलनवाडीबोरगावकुरझानवेगाव, मेढकी, हलदा परिसरातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील सुरक्षा नगरआंबेडकर वार्डनवीन सुमठानागुरु नगरभंगाराम वार्डडिफेन्स चांदा परिसर,सागरा,माजरी कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील चौगानशिवाजी वार्डरामनगर भागातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील मोहाडीनवेगावलोनखैरी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधीकन्हाळगावगोवर्धन चौक परिसरनवखळावलणी,बाळापुरपुलगाव भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसरअंबुजा सिमेंट कॉलनी परिसर,उपरवाही भागातून बाधित ठरले आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील वार्ड नंबर 13, वार्ड नंबर 12, वार्ड नंबर 7 परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.मुल तालुक्यातील वार्ड नंबर 7, वार्ड नंबर 16, वार्ड नंबर 12, वार्ड नंबर 9, मारोडामारेगाव,गडीसुर्लाचिंचाळा परिसरातून बाधित ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील जोगापुरविहिरगावबँक ऑफ इंडिया परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

000000

No comments:

Post a Comment