Search This Blog

Wednesday 14 October 2020

गाय दूध, टोन्ड (आरे) दूधाच्या दरात 16 ऑक्टोंबरपासून प्रती लिटर दोन रुपये वाढ

 गाय दूध, टोन्ड (आरे) दूधाच्या दरात

16 ऑक्टोंबरपासून प्रती लिटर दोन रुपये वाढ

चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोंबर : शासन निर्णयानुसार शासकीय दूध योजना,चंद्रपूर अंतर्गत विक्री करण्यात येणाऱ्या पाश्चराईज्ड व होमोजनाईज्ड गाय दूध व टोन्ड (आरे) दूधाच्या विक्रीच्या दरात 16 ऑक्टोंबरपासून प्रती लिटर दोन रुपये वाढ करण्यात येणार आहे. एक लिटर दूधाला (1 हजार मिली) रुपये 38 व अर्धा लिटर (500 मिली) दुधाला रुपये 19 दर सर्व करासह आकारण्यात येणार आहे, अशी माहिती दुग्धशाळा व्यवस्थापक राजेंद्र डोले यांनी दिली आहे.

त्याचप्रमाणे दुग्धशाळेतील उपलब्ध असलेल्या जुन्या दराचे पॉलिथिन फिल्मचा साठा संपुष्टात येईपर्यंत व वाढीव दराचे पॉलिथिन उपलब्ध होईपर्यंत जुन्याच दराच्या पॉलिथिन फिल्म मधून दुधाची विक्री करण्यात येईल. सर्व ग्राहकांनी व वितरकांनी योजनेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

000000

No comments:

Post a Comment