Search This Blog

Friday 9 October 2020

सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ई-आर मध्ये सादर करावी


 सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची

त्रैमासिक माहिती नमुना ई-आर मध्ये सादर करावी

चंद्रपूर दि. 9 ऑक्टोंबर: सप्टेंबर 2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर- 1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर या कार्यालयाद्वारे चालू असून सर्व आस्थापनांकडून  100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोंबर असून विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे तसेच प्रत्येक आस्थापणेने नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीयनिमशासकीयतसेच कलम 5(2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची स्त्री-पुरुष व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीसविषयाकिंत कायद्यातील तरतुदीनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडून यापूर्वीच युजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करून आपली अचूक माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावी.

यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com अथवा asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशिलासह संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment