Search This Blog

Sunday 4 October 2020

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 5 ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 5 ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विकास कामांबाबत घेणार आढावा

चंद्रपूरदि.4 ऑक्टोंबर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

5 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदासपेठनागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 12:00 वाजता  नियोजन भवनचंद्रपूर येथे आगमन व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरीसावलीसिंदेवाही तालुक्यातील विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 1:30 वाजता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत वनपट्टे वाटप संदर्भात वन व महसूल यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत.

दुपारी 2:30 ते 3:00 ही वेळ राखीव असून सायंकाळी 4:00 वाजता चंद्रपूर वरून नागपूर कडे प्रयाण करतील. सायंकाळी 6:00 वाजता कमलाई निवासरामदास पेठनागपूर येथे आगमन व मुक्काम राहतील.

00000


No comments:

Post a Comment