Search This Blog

Saturday 17 October 2020

माजी सैनिक, विधवांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये मुदतवाढ


 माजी सैनिकविधवांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये मुदतवाढ

चंद्रपूरदि.17 ऑक्टोंबर: कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय सैनिक बोर्डाकडून माजी सैनिकांनाविधवांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये मुदतवाढ करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

अशी आहे अर्ज भरण्याची मुदत वाढ:

मुलीच्या विवाहासाठी किंवा विधवेच्या पुनर्विवाहासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारिख पुर्वी विवाह झाल्यापासुन 180 दिवसांचे आत अशी होती. आता 22 सप्टेंबर 2019 नंतर विवाह झालेल्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारिख 30 नोव्हेंबर 2020 करण्यात आली आहे.

कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वर्ग 1 ते 9 व वर्ग 11 च्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा न घेता त्यांच्या इंटरनल असेसमेंट वर त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक आर्थिक मदतीच्या ऑनलाईन अर्जासोबत शैक्षणिक वर्ष 2019-20 ची गुणपत्रिका न जोडण्याची सुट देण्यात आली आहे व त्या व्यतिरीक्त संबंधित शाळेकडून पुढील वर्गात प्रवेश केल्याबाबतचे प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करता येईल. पूर्वी शैक्षणिक आर्थिक मदतीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारिख 30 सप्टेंबर 2020 अशी होती ती आता 30 नोव्हेंबर 2020 करण्यात आली आहे.

सर्व संबंधित माजी सैनिकविधवांनी ऑनलाईन अर्ज वर नमुद केलेल्या तारखांपर्यंत भरावेतअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment