Search This Blog

Wednesday 21 October 2020

उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयात संगणक दुरुस्तीसाठी निविदा आमंत्रित

 उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयात

संगणक दुरुस्तीसाठी निविदा आमंत्रित

चंद्रपूरदि.21 ऑक्टोंबर:उपविभागीय अधिकारी,चंद्रपूर कार्यालयातील संगणक संचयुपीएस आणि प्रिंटर्स यांमध्ये काही बिघाड आल्यास ते दुरुस्ती व कारटेज रिफीलींग करण्याकरीता वार्षीक देखभाल करार करण्याकरीता  स्थानिक पुरवठाधारकाकडुन अंदाजे 7 संगणक संच व युपीएस तसेच प्रिंटर्स व कारटेज रिफीलीग करीता दराबाबत कोटेशन मागविण्यात आले आहे. दुरुस्ती करीता लागणारे साहित्याचे (हार्डवेअर) देयके वेगळ्याने अदा करण्यात येईल.

दर कराराच्या अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत आस्थापना शाखा उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे अवलोकनास्तव उपलब्ध करून देण्यात आलेले आहेअसे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment