Search This Blog

Friday 23 October 2020

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न

 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न

चंद्रपूर,दि.23 ऑक्टोंबर: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर या कार्यालयाच्या माध्यमातून दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन वेबीनार कार्यक्रम संपन्न झाला. सदर वेबिनारचा लाभ ऑनलाईन पध्दतीने देण्यात आला. वेबिनारचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले. वेबिनारचे मार्गदर्शक  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक आसावरी देशमुख यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून केवळ मराठा समाजातील गरजू बेरोजगार उमेदवारांना स्वंयरोजगारासाठी वैयक्तिक कर्ज व्याज योजना (आयआर 9) अंतर्गत कर्ज रक्कम मर्यादा 10 लाखापर्यंत गट प्रकल्पः कर्ण व्याज प्रतावा योजना (आयआर 2) अंतर्गत कर्ज रक्कम मर्यादा 10 लाख ते 50 लाखापर्यत गट कर्ज योजना (एफपीओ) (जीएल-1) अंतर्गत कर्ज स्क्कम मर्यादा 10 लाखपर्यंत कर्जावरील व्याज परतावा योजनेबाबत माहिती देण्यात आली तसेच व्यवसाय समुपदेशन करण्यात आले. या वेबीनार मध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी सहभाग दर्शवला.

00000

No comments:

Post a Comment