Search This Blog

Tuesday 20 October 2020

मागील 24 तासात 247 कोरोनामुक्त

 

मागील 24 तासात 247 कोरोनामुक्त

195 नव्याने पॉझिटिव्ह तीन बाधितांचा मृत्यू

Ø  आतापर्यंत 10701 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 2898

चंद्रपूरदि. 20 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 247 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 195 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील 60 वर्षीय व 65 वर्षीय पुरुषस्वावलंबी नगर येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 208 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 197, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 195 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 13 हजार 807 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  247  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 701 झाली आहे.  सध्या 2 हजार 898 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्हयात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 955 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 95 हजार 669 नमुने निगेटीव्ह आले आहे.  नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 195 बाधितांमध्ये  113 पुरुष व 82 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 76, पोंभुर्णा तालुक्यातील 15, बल्लारपूर तालुक्यातील सहाचिमूर तालुक्यातील पाचमुल तालुक्यातील 10, कोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा,  वरोरा तालुक्यातील आठ,भद्रावती तालुक्यातील 20, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील 10, राजुरा तालुक्यातील 13, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, नागभिड तालुक्यातील 9,  गडचिरोली येथील दोन तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण 195 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील  बियानी नगर तुकुमएकोरी वार्डओम नगरभिवापुरबापट नगरबालाजी वार्डकृष्णा नगरविजयनगरबंगाली कॅम्प परिसरआंबेडकर नगर बाबुपेठइंदिरानगरघुग्घुसगंज वार्डनगीनाबागविठ्ठल मंदिर वार्डशिवाजीनगररामनगरसंजय नगरसम्राट नगरऊर्जानगरसमाधी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्डविसापूरबालाजी वार्डगौरक्षण वार्डविवेकानंद वार्डकिल्ला वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील मालवीय वार्डआशीर्वाद वार्डअभ्यंकर वार्डबोर्डाराजीव गांधी वार्डमाढेळी परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगरमेंढापटेल नगरगांधिनगरपरिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील श्रीराम नगरगुरु नगरसंताजी नगरकन्नमवार वार्डनवीन सुमठाणापिपरबोडीखापरी वार्डपांडव वार्डडिफेन्स चांदा परिसरमासळ परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील सास्तीविहीरगावअमराई वार्डटिचर कॉलनी परिसरदेशपांडे वाडी भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्डनेरी भागातून बाधित ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील टेकाडीचारगावनवरगावदेलनवाडी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील राम मंदिर परिसरबाजार चौक, सावरगावबाळापुरतळोधी भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील गडीसुर्लाभागातून बाधीत ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील शास्त्रीनगरडोंगर हळदीशिवाजी चौकआष्टा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली,लाठी भागातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment