Search This Blog

Monday 26 October 2020

दोन दिवसात 421 बाधितांची कोरोनावर मात


 दोन दिवसात 421 बाधितांची कोरोनावर मात

48 तासात 5 मृत्यू ; 277 नवीन बाधित

Ø आतापर्यंत 11860 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2779

Ø  एकूण बाधितांची संख्या 14861

चंद्रपूरदि. 26 ऑक्टोबर: जिल्ह्यात रविवारी 215 व सोमवारी दिवसभरात 206 असे मागील दोन दिवसात 421 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच गत 48 तासात जिल्ह्यात एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून पहिल्या 24 तासात तीन जण तर दुसऱ्या 24 तासात दोन कोरोनाबाधितांचा समावेश आहे. तसेच दोन्ही दिवसात जिल्ह्यात एकूण 277 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

रविवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्ड येथील 65 वर्षीय महिला,  नागभिड तालुक्यातील नवखळा येथील 89 वर्षीय पुरुषवरोरा शहरातील टिळक वार्ड येथील 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सोमवारी चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 77 वर्षीय महिला आणि गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 222 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 209, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली चारयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 14 हजार 861 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 11 हजार 860 झाली आहे. सध्या 2 हजार 779 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 738 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 99 हजार 501 अहवाल निगेटीव्ह आले आहे.

कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडित व्हावी यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे. बाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी सदैव मास्कचा वापर करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात रविवारी पुढे आलेल्या 188 बाधितांमध्ये 121 पुरुष व 67 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 85, पोंभुर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील आठ,  चिमूर तालुक्यातील चारमुल तालुक्यातील 9, गोंडपिपरी तालुक्यातील चारकोरपना तालुक्यातील तीनब्रह्मपुरी तालुक्यातील 16,  नागभीड तालुक्यातील 14, वरोरा तालुक्यातील 9,भद्रावती तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील 12 तर गडचिरोली  येथील असे एकूण 188 जणांचा समावेश आहे.

 तर सोमवारी बाधित झालेल्या 89 जणांमध्ये 51 पुरूष व 38 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 54, चिमूर तालुक्यातील एकमुल तालुक्यातील एकजिवती तालुक्यातील तीनकोरपना तालुक्यातील सहाब्रह्मपुरी तालुक्यातील 18,  सिंदेवाही तालुक्यातील दोन, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली दोन, यवतमाळ येथील एक असे एकूण 89 जणांचा समावेश आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील स्वस्तिक नगरकृष्णनगर,  बाबुपेठघुग्घुसमहाकाली वार्डरामनगरतुकूमभिवापूर वार्डबाजार वार्डएकोरी वार्डजटपुरा गेट परिसरअष्टभुजा वार्डचिचपल्लीसौगात नगरसंजय नगरऊर्जानगरबंगाली कॅम्प परीसरविठ्ठल मंदिर वार्डवडगावदुर्गापुरसुमित्रा नगरशंकर नगरबालाजी वार्डपठाणपुरासिव्हिल लाईनअंचलेश्वर वॉर्डदाताळास्नेहनगरअजयपुरनकोडाशास्त्रीनगरछोटा बाजारइंदिरानगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील संतोषीमाता वार्डकोठारीविद्या नगर वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील उमरी भागातून बाधित ठरले आहे.

            वरोरा तालुक्यातील विठ्ठल मंदिर वार्डकर्मवीर वार्डदेशपांडे लेआउट परिसरआनंदवनसिद्धार्थ वार्डशेगाव परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील ओम नगरदेलनवाडीआवडगावगांधिनगरविद्यानगर, नवरगाव,पेठ वार्ड,परिसरातून बाधित ठरले आहे.भद्रावती तालुक्यातील गांधी चौकचिंचोलीसुमठाणाशिवाजीनगरचंडिका वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील सास्ती,भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील काचेपारमहात्मा फुले चौक परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील पारडीगोवर्धन चौक परिसरनवखळाबाळापुरतळोधीवलनी भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील संत गाडगे बाबा चौक परिसरगडचांदूरमाणिकगड कॉलनी भागातून बाधित ठरले आहे.

मुल तालुक्यातील केळझरवार्ड नंबर 17चितेगाव परिसरातून बाधित ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील  जोगापुरवार्ड नंबर 18 परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment