Search This Blog

Wednesday 21 October 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 10861 बाधित झाले बरे

 

जिल्ह्यात आतापर्यंत 10861 बाधित झाले बरे

गेल्या 24 तासात 183 नव्याने बाधित एका बाधिताचा मृत्यू

Ø  उपचार घेत असलेले बाधित 2920

Ø  जिल्हयातील एकुण बाधितांची संख्या 13990

चंद्रपूरदि. 21 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 183 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील मातोश्री शाळेजवळ तुकूम येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 209 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 198, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 183 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 13 हजार 990 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  160  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 861 झाली आहे.  सध्या 2 हजार 920 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 934 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 96 हजार 477 नमुने निगेटीव्ह आले आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 183 बाधितांमध्ये  114 पुरुष व 69 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 57पोंभुर्णा तालुक्यातील तीनबल्लारपूर तालुक्यातील सातचिमूर तालुक्यातील दोनमुल तालुक्यातील 26जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील दोनब्रह्मपुरी तालुक्यातील 22नागभिड तालुक्यातील 22,   वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील 15राजुरा तालुक्यातील 10गडचिरोली येथील दोन असे एकूण 183 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील बाबुपेठतुकूमभिवापुरवार्डओम नगरशिवाजीनगर घुग्घुसम्हाडा कॉलनी परिसरहनुमान नगरनगीनाबागबापट नगरबालाजी वार्डआनंदनगरबंगाली कॅम्प परिसरजलनगर वार्डबाजार वार्डस्नेहनगरअंचलेश्वर वार्डलक्ष्मी नगर वडगावसंजय नगर,नकोडा भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्डगांधी चौक परिसरकन्नमवार वार्डरविन्द्र नगरगणपती वार्डबिल्ट कॉलनी परिसरझाकीर हुसेन वार्ड भागातून बाधित ठरले आहे.वरोरा तालुक्यातील वैष्णवी नगरलक्ष्मी नगरआनंदवनराजेंद्रप्रसाद वार्डवनोजाकरंजी परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूरविद्यानगरगांधी नगरखेडकीदवाई वार्डगुजरी वार्डकुरझा,मेढंकीदेलनवाडीशारदा कॉलनी परिसरपेठ वार्डपटेल नगरसोंदरीसुंदर नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील सुरक्षा नगरगांधी चौक परिसरश्रीराम नगर,परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सोमनाथपूर वार्डजवाहर नगरआझाद चौकविहिरगावधोपटाळा,भागातून बाधित पुढे आले आहे.

चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड,आबादी वार्ड भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरकळमगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.नागभीड तालुक्यातील राम मंदिर चौक परिसर, शिवाजी चौक गिरगावतळोधीगायमुख पार्डीसुलेझरीबाजार चौक भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील नांदगावराजगड भागातून बाधित ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील कासरगट्टा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. जिवती तालुक्यातील भारी भागातून बाधित पुढे आले आहे.

000000

No comments:

Post a Comment