Search This Blog

Friday 9 October 2020

दुर्गा व शारदा उत्सवात दान- देणगी गोळा करण्यासाठी परवानगी देणे सुरू

 दुर्गा व शारदा उत्सवात दान- देणगी गोळा करण्यासाठी परवानगी देणे सुरू

ऑनलाइन,ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.9 ऑक्टोबर: महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम  1950 चे कलम 41 क अन्वये सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाद्वारे  दुर्गा व शारदा नवरात्र उत्सवासाठी दान देणगी गोळा करून तात्पुरत्या स्वरूपात उत्सव साजरा करण्यासाठी अर्जदार मंडळाकडून ऑनलाइनऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहे.‌ यासाठी  www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहेअसे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त सी.एम ढबाले यांनी केले आहे.

 

अर्ज भरण्याकरिता अत्यावश्यक बाबी:

अर्ज पुर्णपणे भरलेला असणे आवश्यक आहे. मुळ ठरावाची सर्व सभासदाची स्वाक्षरी असलेली प्रतजागेचे नाहरकत प्रमाणपत्र (संबंधित महानगरपालिकानगरपरिषदग्रामपंचायत यांचे)विद्युत बिलाची झेरॉक्स प्रतसर्व सभासदांचे पॅनकार्डआधार कार्डमागील वर्षीची परवानगीची प्रत,  रुपये 100 च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रमागील वर्षाचा हिशोब देणे आवश्यकमंडळाचे मागील वर्षाचे उत्पन्न रुपये 5 हजार पेक्षा जास्त असल्यास अंकेक्षण अहवाल अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइन भरत असतांना आवश्यकबंधनकारक सर्व दस्तऐवज स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. कोविड-19 संबंधात जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेली आवश्यक सर्व निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.

00000

No comments:

Post a Comment