Search This Blog

Thursday 22 October 2020

मोटर वाहन परवान्यासाठी स्लॉट बुकींग मध्ये वाढ

 मोटर वाहन परवान्यासाठी स्लॉट बुकींग मध्ये वाढ

प्रत्येक शनिवार-रविवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

चंद्रपूर दि.22 ऑक्टोबर:  चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स)  व पक्के अनुज्ञप्ती (परमनंट लायसन्स) यासाठी जनतेला प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून स्लॉट बुकिंग दिनांक 22 ऑक्टोबर 2020 पासून वाढविण्यात येत आहे.

दिनांक 24 व 25 ऑक्टोंबर 2020 शनिवार व रविवार  सुट्टीचे दिवशी शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्तीचे काम सुरू राहील. तसेच प्रत्येक शनिवार व रविवारला शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक जाधव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment