Search This Blog

Tuesday 6 October 2020

ना. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूर व अमरावती विभागाला 61 कोटी 32 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर

 

ना. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपूर व अमरावती विभागाला 61 कोटी 32 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर

 कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : ना. विजय वडेट्टीवार

 

चंद्रपूरदि. ऑक्टोंबर: राज्यामध्ये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे. याच धर्तीवर राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री  विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर व अमरावती विभागाला 61 कोटी 32 लाख 70 हजार रुपयांचा निधी  मंजूर  करण्यात आला असून संबंधित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावतीसाठी 14 कोटी 34 लक्ष 89 हजार रुपयेयवतमाळ कोटी 16 लक्ष 72 हजार रुपयेबुलढाणा कोटी 27 लक्ष 16 हजार रुपयेवाशिम कोटी 98 लक्ष 38 हजार रुपयेअसा एकूण अमरावती विभागासाठी 24 कोटी 77 लक्ष 15 हजार इतका निधी मंजूर झाला आहे.

तसेच नागपूरसाठी 13 कोटी 22 लक्ष 02 हजार रुपयेवर्धा कोटी 74 लक्ष 15 हजारभंडारा कोटी 49 लक्ष 84 हजारगोंदिया कोटी 03 लक्ष 32 हजारचंद्रपूर कोटी 45 लक्ष 14 हजारगडचिरोली कोटी 61 लक्ष  08 हजार असे एकूण नागपूर विभागासाठी 36 कोटी 55 लक्ष 55 हजार इतका निधी मंजूर झाला आहे. नागपूर व अमरावती विभागाला  कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी एकूण 61 कोटी 32 लाख 70 हजार रुपयांचा निधी  मंजूर  झाला असून तो बीम्स प्रणालीवर आधारित आहे.

कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी आतापर्यंत एकूण 485 कोटी 13 लक्ष इतका निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यात आला असून  नागपूर 48 कोटी रुपयेअमरावती 22 कोटी 61 लक्ष रुपयेऔरंगाबाद 52 कोटी 50 लक्ष रुपयेनाशिक 18 कोटी 70 लक्ष रुपयेपुणे 103 कोटी रुपयेकोकण 235 कोटी 28 लक्ष रुपयेसार्वजनिक आरोग्य विभाग कोटी 04 लक्ष रुपये असे विभागीय आयुक्तांमार्फत आतापर्यंत कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकूण 485 कोटी 13 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तरी येणाऱ्या काळात कोविडला हद्दपार करण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक असतील त्या शासन स्तरावर तत्परतेने राबविल्या जातील यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असा विश्वास श्री. वड्डेटीवार यांनी व्यक्त केला आहे.

00000

No comments:

Post a Comment