Search This Blog

Sunday, 4 October 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 11026



चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 11026

7558 बाधित कोरोनातून  झाले बरे;

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 3301

24 तासात आणखी 159 बाधितचार बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 4 ऑक्टोंबर : जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 159 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 11 हजार 26 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 301 असून आतापर्यंत 7 हजार 558 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येभद्रावती येथील 67 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू साईबाबा वार्डबल्लारपूर येथील  59 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू आकाशवाणी चौकचंद्रपुर येथील 68 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरचवथा मृत्यू बालाजी वार्डचंद्रपुर येथील 50 वर्षीय महिला बाधितेचा  झाला आहे. या बाधितेला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. चारही मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 167 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 158, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 77, बल्लारपूर तालुक्यातील 14, चिमूर तालुक्यातील आठजिवती तालुक्यातील एक,  कोरपना तालुक्यातील सहाब्रह्मपुरी तालुक्यातील सहानागभीड तालुक्यातील पाचवरोरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 10, सावली तालुक्यातील 10,  सिंदेवाही तालुक्यातील आठभंडारा व पुणे येथील प्रत्येकी दोन असे एकूण 159 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातून गंज वार्डदुर्गापुरमहाकाली वार्डबापट नगरभाना पेठ वार्डनगीना बागभिवापूर वार्डइंदिरानगररामनगरसरकार नगरविठ्ठल मंदिर वार्डबाबुपेठजलनगरचिचपल्लीलोहारातुकूमसुमित्रा नगरपंचशील चौकस्वस्तिक नगरबंगाली कॅम्पबालाजी वार्ड  भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्डशिवाजी वार्डसंतोषी माता वार्डकिल्ला वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील गांधी वार्डबिरसा मंदिर,सास्तीपेठ वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील राम वाटिका बोर्डामाजरीसहारा पार्क परिसरजीएमआर क्वॉटरचारगावआंबेडकर लेआउट परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील शिवाजी वार्डखेडविद्यानगरगांगलवाडी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील चंडिका वार्डपंचशील नगरसुमठाणाश्रीराम नगरझाडे प्लॉट परिसरकिल्ला वार्डकोंढासाईनगर,श्रीकृष्ण नगरसागरा परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील अंतरगावपेंढरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील प्रगती नगरगोवर्धन चौक परिसरडोंगरगाव परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील राजीव गांधी नगरवडाळा पैकुआंबे नेरीटीचर कॉलनी परिसरआझाद वार्डकवठाळा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील कोडशीउपरवाही भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment