Search This Blog

Saturday, 3 October 2020

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण ; 24 तासात 114 ची नोंद

 


जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण 24 तासात 114 ची नोंद 

Ø  7130 बरे ; 3574 बाधितांवर उपचार सुरू

Ø  आतापर्यत एकूण बाधितांची संख्या 10867

Ø  गेल्या 24 तासात एका बाधितेचा मृत्यू

चंद्रपूरदि. 3 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिन्याभरात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात 114 बाधित पुढे आले आहे. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 10 हजार 867 झाली आहे. 3 हजार 574 बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 7 हजार 130 बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत. नागरिकांनी बाहेर पडतांना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावे. नागरिकांनी आपला आजार लपवून न ठेवताप्रशासनाला माहिती देऊन तपासणी करून घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात एका बाधितेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भिवापूर वार्डचंद्रपूर येथील 76 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधितेला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 163 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 154, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 78 बाधितबल्लारपूर तालुक्यातील चारमुल तालुक्यातील 9, जिवती तालुक्यातील एक,  कोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील चारनागभीड तालुक्यातील दोनवरोरा तालुक्यातील चारभद्रावती तालुक्यातील एकसावली तालुक्यातील तीन,  सिंदेवाही तालुक्यातील सात असे एकूण 114 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातून जीएमसी परिसरशिवाजीनगरबाबुपेठमुक्ती कॉलनी परिसरनगीना बागसिस्टर कॉलनीजटपुरा गेट परिसरमेजर गेट परिसरचोर खिडकीअष्टभुजा चौकसुमित्रा नगरएकोरी वार्डऊर्जानगरविठ्ठल मंदिर वार्डबालाजी वार्डसिंधी कॉलनी परिसरसंजय नगरघुटकाळा वार्डसिव्हिल लाईनसमता नगरसमाधी वार्डस्नेह नगरतुकूमश्रीराम वार्डकोतवाली वार्डवृंदावन नगरबंगाली कॅम्पअरविंद नगरइंदिरानगरजयनगर वार्डविवेक नगर या भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्डदादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह आढळले आहे.

        मुल येथील वार्ड नंबर एकवार्ड नंबर 16, वार्ड नंबर 17 तसेच तालुक्यातील सिंताळाराजुली भागातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बाजार चौकस्नेहनगरगुजरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणासावरगांव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्डमजरा भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगावनिमगाव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील लोनवाहीमदनापुर वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

000000

No comments:

Post a Comment