Search This Blog

Monday 19 October 2020

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनामुळे सहा मृत्यू

 

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनामुळे सहा मृत्यू

212 नव्याने पॉझिटिव्ह ; 178  जणांना सुटी

चंद्रपूरदि. 19 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 212 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 13 हजार 612 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  178  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 454 झाली आहे.  सध्या 2 हजार 953 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्हयात आतापर्यंत 1 लाख 9 हजार 729 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 94 हजार 841 नमुने निगेटीव्ह आले.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुर शहरातील विजय नगर तुकुम येथील 55 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी परिसर येथील 70 वर्षीय पुरुष, राजुरा शहरातील नेहरू चौक येथील 65 वर्षीय पुरूष, राजुरा तालुक्यातील खामोना येथील 50 वर्षीय पुरुष, भद्रावती शहरातील श्रीकृष्ण नगर येथील 64 वर्षीय पुरुष तसेच भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द येथील 64 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 205 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 194, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 101 बाधितपोंभुर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील दोनचिमूर तालुक्यातील एकमुल तालुक्यातील 50, कोरपना तालुक्यातील सहाब्रह्मपुरी तालुक्यातील 10,  वरोरा तालुक्यातील 16,भद्रावती तालुक्यातील 14, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील सात,  गडचिरोली व वणी-यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 212 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील रामनगरतुकूमरयतवारीश्यामनगरछत्रपती नगरराष्ट्रवादी कॉलनी परिसरमहेश नगरसरकार नगरघुटकाळा वार्डएकोरी वार्डबालाजी वार्डविठ्ठल मंदिर वार्डजटपुरा वार्डबाबुपेठदुर्गापुरनकोडा,पडोलीगंजवार्डसौगात नगर, कृष्णा नगरविवेक नगरआनंदनगरबालाजी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डाविनायक लेआउट परिसरजिजामाता वार्डआनंदवनकृषी नगरदेशपांडे लेआउट  परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील  मेढंकीसुंदर नगरझाशी राणी चौक परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील छत्रपती लेआउट परिसरनवीन सुमठाणाडिफेन्स चांदा परिसरझिगुंजी वार्डशिवाजीनगर,पिपरबोडीसुरक्षा नगर,परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील हनुमान मंदिर मुखाडा भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील जुनासूर्लाहिमालया राईस मिल परिसरमारोडावार्ड नं.16, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट कॉलनी परिसरगडचांदूर भागातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment