Search This Blog

Friday, 2 October 2020

जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा जास्त


 

जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा जास्त  

Ø  24 तासात सर्वाधिक 539 बाधित कोरोनातून झाले बरे; तर केवळ 239 नव्या बाधितांची नोंद

Ø  उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3862

Ø  जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 10753 वर

Ø  गेल्या 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 2 ऑक्टोंबर: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 239 नवीन बाधितांची नोंद झाली असून उपचाराअंती सर्वाधिक 539 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच, मध्यंतरी करण्यात आलेली जनता संचार बंदी यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गती संथ झाली आहेबाधित होण्याचा दर मंदावला आहेअशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावेबाहेर पडताना मास्कचा वापर करावातसेच हात सॅनीटायजर अथवा साबणाने स्वच्छ करावे. दैनंदिन कामे करताना शारीरिक अंतर राखावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 10 हजार 753 वर गेली आहे. आतापर्यंत 6 हजार 729 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 862 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येरामनगरराजुरा येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 26 सप्टेंबरला मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 24 सप्टेंबरला श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू नवरगावसिंदेवाही येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 26 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरपाचवा मृत्यू महात्मा गांधी वार्डबल्लारपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 29 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. वरील मृत्यू झालेल्या पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. चवथ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तरपाचव्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 162 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 153, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा एक बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 152 बाधितबल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील पाचमुल तालुक्यातील 10, कोरपना तालुक्यातील चारब्रह्मपुरी तालुक्यातील पाचनागभीड तालुक्यातील आठवरोरा तालुक्यातील चारभद्रावती तालुक्यातील 13, सावली तालुक्यातील पाच,  सिंदेवाही तालुक्यातील आठराजुरा तालुक्यातील 14 असे एकूण 239 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातून तुकूमजीएमसी परिसरबालाजी वार्डऊर्जानगरदुर्गापुरभानापेठशास्त्रीनगरराजकला टॉकीज परिसरडब्ल्यूसीएल कॉलनी परिसरएमआयडीसी परिसरजल नगरसमाधी वार्डरामाळा तलावनगीना बाग विठ्ठल मंदिर वार्डरामनगरभिवापूर वार्डसरकार नगरबाबुपेठअंचलेश्वर गेट परिसरदादमहल वार्डपडोलीगंजेवार्डमहाकाली कॉलरीघुटकाळा वार्डस्नेहनगरसिस्टर कॉलनी परिसरइंदिरानगरमहसूल भवन परिसरजयराज नगर तुकुमश्रीराम वार्डसुमित्रा नगरसिंधी कॉलनी परिसरघुग्घुस या भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्यातील या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्डविसापूरटिळक वार्डकिल्ला वार्डबालाजी वार्डसुभाष वार्डगांधी वार्डबामणी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील मोटेगावगांधी वार्डआझाद वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

मुल तालुक्यातील विरईतसेच शहरातील वार्ड नंबर सहावार्ड नंबर 16 परिसरातून बाधित पुढे आले आहे.कोरपना तालुक्यातील गडचांदूरउपरवाही भागातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगरहनुमान नगर,  हेटी खामखुरासंत रवीदास चौकहळदा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील प्रगती नगरगिरगावपेंढरीबाळापुरनवखळातलोढी भागातून बाधित ठरले आहे.वरोरा तालुक्यातील गजानन नगरजिजामाता वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

भद्रावती तालुक्यातील झाडे प्लॉट परिसरश्रीकृष्ण नगरसूर्य मंदिर वार्डचंदनखेडा,माजरीसावरकर नगरझिंगोजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.सावली तालुक्यातील निफंद्रा भागातून बाधित ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील पोस्ट ऑफिस परिसररामपूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment