Search This Blog

Friday, 27 February 2026

शुभमंगल सामूहिक विवाह किंवा नोंदणीकृत विवाहासाठी 25 हजार रुपये अनुदान


शुभमंगल सामूहिक विवाह किंवा नोंदणीकृत विवाहासाठी 25 हजार रुपये अनुदान

चंद्रपूरदि. 27 :  शेतकरीशेतमजुरनिराधारपरित्यक्त्या व विधवा महिलेच्या मुलीच्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी ‘शुभमंगल सामूहिक विवाह योजना’ शासनामार्फत राबविण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस प्रशासकीय सहाय्य प्रति जोडपे 25 हजार रुपये देण्यात येतेतर सामूहिक विवाहात लग्न लावलेल्यानोंदणीकृत विवाह केलेल्या वधूची आई / वधूचे वडिल /वधू यांचे नावाने 25 हजार रुपये अनुदान दिल्या जाते.

या योजनेअंतर्गत एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान तर कमाल 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील. 100 जोडप्यांच्या वर समावेश असलेल्या विवाह सोहळ्यासाठी अनुदान अनुज्ञेय राहणार नाहीएका स्वयंसेवी संस्थेस वर्षातून दोनदा सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येईलया योजनेअंतर्गत सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्था नोंदणी अधिनियम 1860 किंवा सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 किंवा महाराष्ट्र सहकारी संस्थाचे अधिनियम 1960 अंतर्गत स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असावीसामूहिक विवाहात सहभागी होणाऱ्या वधुचे वय 18 वर्ष व वरचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहेतसेच वधू ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.

आवश्यक कागदपत्रे : बँक खाते तपशीलबैंक शाखाआयएफसी कोड याबाबतचा तपशीलविवाह झालेल्या जोडप्याचा निबंधक विवाह नोंदणी यांचे प्रमाणपत्रसदर योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा लक्ष रुपये आहेस्वयंसेवी संस्थेने / लाभार्थ्यांनी खालील बाबीचे एकत्रित प्रमाणपत्र किंवा दाखला अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहेरहिवासी दाखला (पत्याबाबत), जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखलातलाठी किंवा ग्रामसेवकाचा दाखलाउत्पन्न दाखला तलाठी/तहसीलदार,  विवाह नोंदणी प्रमाणपत्र.

सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने सामूहिक विवाहात सहभागी जोडप्यांचे अर्ज एकत्रितपणेविहित नमुन्यातील माहिती कागदपत्रे तसेच मागणी प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीआकाशवाणीच्या मागे सिव्हिल लाईनचंद्रपूर येथे सादर करावे.

००००००

मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत निवड चाचणीचे आयोजन


मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत निवड चाचणीचे आयोजन

चंद्रपूरदि. 27 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत मिशन लक्ष्यवेध ही योजना राबविण्यात येत आहेसदर योजनेंतर्गत विभागीय क्रीडा निपुणता केंद्रउपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागनागपूर येथे स्थापन करण्यात येणार आहेत्याअनुषंगाने टेबल टेनिस आणि अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकाराची निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुलनागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

सदर निवड चाचणी करिता निकष खालीलप्रमाणे आहे.

अॅथलेटिक्स : वयोमर्यादा 25 वर्षाआतील मुले मुली. (त्या  वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी)

आवश्यक कागदपत्रे : जन्म दाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्रआधार कार्डगत वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्रपासपोर्ट साईज फोटोग्राफ , शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्रपालकाचे संमती पत्र इमहाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे.  राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूगत वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यकशासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.

टेबल टेनिस : वयोमर्यादा  25 वर्षाआतील मुलेमुली (त्या वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी)

आवश्यक कागदपत्रे जन्म दाखलाशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्रआधार कार्डगत वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्रपासपोर्ट साईज फोटोग्राफ  ,शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्रपालकाचे संमती पत्र इ.  महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजेराज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूगत वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यकशासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले  वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.

निवड चाचणीकरीता जास्तीत जास्त खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे 10 मार्च 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपली नोंदणी करावीअसे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहेअधिक माहितीकरिता क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे यांच्याशी संपर्क साधावा.

००००००

आरसेटी मार्फत मोफत निवासी प्रशिक्षण

 

आरसेटी मार्फत मोफत निवासी प्रशिक्षण

चंद्रपूरदि. 27 :  बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने बल्लारपूर रोडजुने डी.एडकॉलेज जवळबाबूपेठयेथे ग्रामीण व शहरी विभागातील महिला पुरुष व युवक-युवतीसाठी शेळीपालनकुकुटपालनडेअरीफार्मिंगकृषी उद्यमी अंतर्गत निवासी मोफत प्रशिक्षण मार्च 2026 पासून सुरु करण्यात येत आहेसदर प्रशिक्षण 13 दिवसांचे आहे.

या प्रशिक्षणात विविध कर्ज प्रकाराबद्दलची माहिती सोबतच इतरही माहिती देण्यात येईलप्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थीला बँक ऑफ इंडिया आरसेटीकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहेप्रशिक्षण घेण्याऱ्याचे वय 18 ते 50 वर्षे असावेतसेच या प्रशिक्षणामध्ये व्यवसायातील अनुभवी व्यक्तींनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल.

सदर प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी 10 ते वाजेपर्यंत बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाचंद्रपूर येथील अनुप कासवटे मो.नं  8421009602  आणि अक्षय लांजेकर मो.नं 9021913751  यांच्याशी संपर्क करून नाव नोंदनी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावाहे प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवास्यांसाठी आहे.

००००००

2 मार्च रोजी लोकशाही दिन

 


मार्च रोजी लोकशाही दिन

चंद्रपूरदि.27 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतेतसेच दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतेतक्रारदारांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे व तालुकास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निकाली निघाल्यानंतर व समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावे.

मार्च 2026 या महिन्याचा पहिला सोमवार मार्च रोजी येत असल्याने या दिवशी दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी प्रतीत अर्ज सादर करावा. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीतद्नंतरच तक्रार अर्ज स्विकारण्यात येईलअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व पंडित दीनदयाल उपाध्याय वसतिगृह योजनेतंर्गत प्रवेशासाठी मुदतवाढ


 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व पंडित दीनदयाल उपाध्याय वसतिगृह योजनेतंर्गत प्रवेशासाठी मुदतवाढ

चंद्रपूरदि. 27 :  शैक्षणिक सत्र 2025-26 करिता इतर मागास प्रवर्गातील मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहेत्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेंतर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

शासनाच्या https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर शासकीय वसतीगृह असलेल्या जिल्ह्यासाठी पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी 12 वी नंतरच्या व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 10 मार्च 2026  पर्यंत ऑनलाईन अर्ज भरून अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रेसंबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी.

तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातीलशासकीय वसतीगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यासाठी पंडित दिनदयाल स्वंयम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले आधार योजनांचे  अर्ज http://hmas mahait.org या पोर्टलवर भरून ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावीअधिक माहितीकरीता इमाव विमाप्र व विजाभज मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह चंद्रपूर येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉसचिन मडावी यांनी केले आहे.

००००००