ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व पंडित दीनदयाल उपाध्याय वसतिगृह योजनेतंर्गत प्रवेशासाठी मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 27 : शैक्षणिक सत्र 2025-26 करिता इतर मागास प्रवर्गातील मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेंतर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
शासनाच्या https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर शासकीय वसतीगृह असलेल्या जिल्ह्यासाठी पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी 12 वी नंतरच्या व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 10 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरून अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे, संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी.
तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील. शासकीय वसतीगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यासाठी पंडित दिनदयाल स्वंयम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले आधार योजनांचे अर्ज http://hmas mahait.org या पोर्टलवर भरून ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी. अधिक माहितीकरीता इमाव विमाप्र व विजाभज मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह चंद्रपूर येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment