Search This Blog

Saturday, 28 February 2026

हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन

 







हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या 
शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन

सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून

'बोले सो निहाल'च्या जयघोषाने दुमदुमले खारघर

 

            नवी मुंबईदि.27(विमाका) :  'हिंद-दी-चादरश्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकालचा गगनभेदी जयघोष आणि या सोहळ्यात संतभाविकलोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात भव्य 'नगर कीर्तनसोहळा पार पडला.

            या ऐतिहासिक नगर कीर्तनाला शुक्रवारी सायंकाळी 5.00 वाजता गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभासीबीडी बेलापूर येथून प्रारंभ झाला. यानंतर डी.वाय.पाटील चौक बेलापूरआरबीआय कॉलनी चौकबेलपाडा मेट्रोखारघर रेल्वे स्टेशन चौकउत्सव चौकग्राम विकास चौकगुरुद्वारा श्री गुरुसिंह सभाखारघर येथून समागम स्थळ ओवे खारघर येथे या नगर किर्तनाचा समारोप करण्यात आला. हे किर्तन केवळ एक शोभा यात्रा नाही तर गुरुसाहेबांच्या त्यागसहासधर्म रक्षा आणि मानवतेचा संदेश सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचा माध्यम आहे.

            सुशोभित आणि भव्य रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंघ जी यांनी पवित्र सेवा अत्यंत भक्तीभावाने केली.

            कलगीधर दशमेश पित्याच्या छत्र छायाखालीशब किर्तन आणि सेवेच्या सहवासात ही अलौकिक यात्रा आपल्या एकताबंधुभाव आणि अध्यात्मिक जागृतीकडे घेऊन जाणार आहेअसा विश्वास या नगर कीर्तनातून मिळाला. धार्मिक कीर्तनगुरु वाणीचे पठण आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. विविध समाजघटकस्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांनी नगर कीर्तनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

             या नगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकधारा यांचा संगम पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक 'गतकाप्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होतीतर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले 'लेझीमनृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात 'मानवता की सच्ची मिसालआणि 'हिंद दी चादरअसे फलक घेऊन सामाजिक संदेश दिला.

            या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहिदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईककोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशीनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदेपनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळेसहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळरायगड उपजिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोडकोकण प्रांत प्रमुख महेंद्र रायचुरानवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिध्दूखारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बलमहाराष्ट्र राज्य शीख समितीचे चरणदिप सिंह (हॅपी सिंग)हिंद दी चादर कार्यक्रमाचे नवी मुंबई सचिव सुखविंदर धिल्लन आदींसह लोकप्रतिनिधी यांनी विशेष उपस्थिती लावून गुरुचरणी नतमस्तक होत कीर्तनात सहभाग नोंदवला.

            यावेळी शीखमोहयालबंजारासिकलीगरलबानासिंधीवाल्मिकीउदासीन तसेच भगत नामदेव संपद्राय या विविध समाज्याचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर भाविकांनी गुरुंच्या शहादतीचे स्मरण करत देशाच्या एकात्मतेचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला. संपूर्ण आयोजनात प्रशासनाने वाहतूकसुरक्षा आणि इतर सुविधांची योग्य व्यवस्था केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.

     हा समागम पुढील दोन दिवस विविध धार्मिकसांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी रंगणार असूनमोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत

 रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरु ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी केलेली फुलांची उधळण आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या संपूर्ण मार्गावर खारघरवासियांनी आपल्या घरांसमोर सडा-रांगोळी काढून नगर कीर्तनाचे जंगी स्वागत केले.

000000

No comments:

Post a Comment