Search This Blog

Wednesday, 4 February 2026

नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे ओळखपत्र नि:शुल्कच


नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे ओळखपत्र नि:शुल्कच

Ø बनावट ओळखपत्रापासून सावध राहण्याचे आवाहन

चंद्रपूर,  दि. 04 : महाराष्ट्र‌ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना ओळखपत्र (स्मार्ट कार्डजिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क वितरीत करण्यात येतेपंरतु काही व्यक्ती दलालांमार्फत पैसे घेऊन बनावटी ओळखपत्र (स्मार्ट कार्डदिले जात असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेतकरीता कोणत्याही बांधकाम कामगारांनी सदरील व्यक्ती /दलाला मार्फत बनावटी ओळखपत्र न घेता जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रातून आपले ओळखपत्र (स्माट कार्डघ्यावे.

सदर ओळखपत्र (स्मार्ट कार्डहे निःशुल्क असल्याने कोणाही व्यक्तीस /एजेंट यांना पैसे देऊ नयेतसेच पैशांची मागणी करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेअसे आवाहान सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment