Search This Blog

Tuesday, 17 February 2026

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2025 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2025 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Ø अंतिम दिनांक 15 मार्च 2026 पर्यंत

            चंद्रपूरदि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहेया स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेतप्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेतअर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

०००००००

No comments:

Post a Comment