Search This Blog

Tuesday, 17 February 2026

असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

 

असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

चंद्रपूरदि. 17 : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने सर्व असंघटीत कामगारांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत नोंदणी करण्याचे सहायक कामगार आयुक्तचंद्रपूर यांनी केले  आहेजिल्ह्यातील सर्व असंघटित पुरुष किंवा स्त्री कामगार यासाठी नोंदणी करू शकतात.

नोंदणीसाठी पात्रता : वय 18-40 वयोगटमासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमीआयकर भरणारा नसावाईपीएफओ व ईएसआयसी अथवा राष्ट्रीय पेंशन योजनेचा सदस्य नसावा.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे : आधारकार्डआधारकार्डशी लिंक असलेले मोबाईल नंबरराष्ट्रीयकृत बैंक पासबुक

मिळणारे लाभ : जर कोणत्याही असंघटित कामगाराने या योजनेचे सदस्यत्व घेतले असेल आणि त्याने वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत नियमित योगदान दिले असेलतर त्याला किमान मासिक हजार रुपये पेन्शन मिळेलत्याच्या/तिच्या मृत्यूनंतरपती/पत्नीला मासिक कुटुंब 50 टक्के पेन्शन मिळेललाभार्थी कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरू ठेवता येणार  आहेलाभार्थीस स्वच्छेने योजनेतून बाहेर पडावयाचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत मिळणार आहे.

नोंदणीची कार्यपध्दती : जिल्ह्यातील नागरी सुविधा केंद्र (CSC) मार्फत नोंदणी करण्यात येईल. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांना 55 ते 200 रुपयांपर्यंत प्रतिमाह अंशदान भरावे लागेललाभार्थी आधार कार्डबैंक पासबुक व मोबाईल क्रमांकासह नागरी सुविधा केंद्रास भेट देईललाभार्थीच्या वयानुसार मासिक अंशदानाच्या रक्कमेची गणना सिस्टीमद्वारे ऑनलाईन करण्यात येईललाभार्थ्यांनी पहिल्या महिन्याची अंशदानाची रक्कम नागरी सुविधा केंद्रात रोखीने भरावे लागेलअंशदानाची रक्कम अदा केल्यानंतर  पेंशन खाता क्रमांक जारी करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांचे कार्यालयप्रशासकीय इमारततळ मजलाचंद्रपूर येथे संपर्क करावानोंदणीसाठी आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्राला (CSC) भेट द्यातुमच्या हक्काचे संरक्षण आणि उज्वल भविष्यासाठी आजच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेकरीता नोंदणी कराअसे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्रविण कावळे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment