Search This Blog

Tuesday, 17 February 2026

दोन दिवसीय वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव कार्यक्रमाचा समारोप


दोन दिवसीय वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव कार्यक्रमाचा समारोप

चंद्रपूरदि. 17 : राज्याच्या लोकसंस्कृतीचा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारसा जपणारा कला महोत्सवप्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहचंद्रपूर येथे 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून कला महोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेसांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन चंद्रपूर येथे भव्य स्वरूपात प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहचंद्रपूर येथे करण्यात आले.

या कार्यक्रमात सांस्कृतिक वारसा जपणा-या कार्यक्रमाचे  सादरीकरण विविध लोककलावंतांच्या माध्यमातून करण्यात आलेया दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

००००००

No comments:

Post a Comment